नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात एंट्री घेतल्यानंतर लगेचच रॉबर्ट वाड्रा यांच्यावरच्या आरोपांमुळे चर्चेत आल्या आहेत. वाड्रा यांच्यावर पैशाची अफरातफर केल्या प्रकरणी आरोप आहेत. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून तात्पुरता दिलासा असला तरी लवकरच सक्तवसुली संचालनालय (ED)त्यांची चौकशी करणार आहे.
रॉबर्ट ED च्या चौकशीला सामोरे जायला तयार आहेत आणि 6 फेब्रुवारीला ते ED च्या चौकशीला हजर होतील, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
प्रियंका गांधी यांची नुकतीच सक्रीय राजकारणात एंट्री झाली आहे. पण पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर झालेले विविध आरोप हा प्रियंका यांच्यासाठी अडचणीचा विषय ठरू शकतो. रोबर्ड वाड्रा यांनी मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Money laundering case: Robert Vadra's lawyer KTS Tulsi ensured in Court that Vadra will join the ED investigation on February 6. https://t.co/1gbGBQo3o8
— ANI (@ANI) February 2, 2019
मनोज अरोडा प्रकरणात वाड्रा यांनी हा अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टात उद्या (शनिवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात वाड्रा यांना दिलासा मिळतो का, हे आता पाहावं लागेल.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. पण प्रियांका यांचे पती असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील विविध आरोपांद्वारे विरोधकांकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अशातच आता वाड्रा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.