• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मोदींच्या जाहीर सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; मंगळसूत्र, पर्स लंपास

मोदींच्या जाहीर सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; मंगळसूत्र, पर्स लंपास

करंजी जवळील आमडी गावातील एका वृद्ध महिलेचेसुद्धा 10 ग्रामचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले.

 • Share this:
  यवतमाळ, 16 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेक कामांचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. या सभेला जिल्हा भरातून महिला सहभागी झाल्या होत्या. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला असून या सभेमध्ये 2 ते 3 महिलांचे मंगळसूत्र चोरून नेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोदींच्या या कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये बचत गट चालवणाऱ्या हजारोंनी महिला उपस्थित होत्या. त्यामुळे सभेत मोठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. अनेक महिलांचे मंगळसूत्र तर अनेक महिलांच्या पर्स चोरीला गेल्या. करंजी जवळील आमडी गावातील एका वृद्ध महिलेचेसुद्धा 10 ग्रामचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार महिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पांढरकवडा पोलीस आता याचा अधिक तपास करत आहेत. Pulwama Attack :तुमच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल- PM मोदी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूच्या बदला घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिले. धुळ्याच्या गोशाळा मैदानात एका सभेत ते बोलत होते. भारत हा नव्या धोरणांचा आणि नवी नीती देश आहे. याचा अनुभव लवकरच जगाला देखील येईल. ज्यांनी गोळया चावल्या, बॉम्ब फेकले अथवा ज्यांनी इतरांच्या हातात बंदूका दिल्या वा बॉम्ब दिले यांच्यापैकी कोणालाच भारताचा जवान सोडणार नाही. भारतावर हल्ला करणाऱ्या कोणालाही जवान स्वस्थ बसू देणार नाहीत. भारताचे हे धोरण राहिलेले आहे की आपण कोणाला त्रास देत नाही. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, नव्या भारताला कोणी त्रास दिला तर अशा शत्रूला भारत सोडणार देखील नाही, असे पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले. दुसऱ्या सर्जिकल स्टाईकचा इशारा भारतीय जवानांनी याआधी शत्रूला धडा शिकवला आहे आणि यावेळी देखील असा धडा शिकवण्यास कोणतीही गय केली जाणार नाही. भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. 'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण
  First published: