दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवलं, अजित पवारांच्या बंगल्यासमोरील घटना

दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवलं, अजित पवारांच्या बंगल्यासमोरील घटना

बारामती शहरात ऐन दिवाळीत गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे.

  • Share this:

बारामती, 15 नोव्हेंबर: बारामती (Baramati) शहरात ऐन दिवाळीत गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या दुकानादाराच्या पत्नीच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठण अज्ञात चोरट्यानं लांबवलं. धक्कादायक म्हणजे ही घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या सहयोग सोसायटी समोरील श्रीराम नगरीत घटना घडली.

बारामती शहरातील श्रीराम नगर येथील तुमच्या लॉन्ड्रीमध्ये आमची कपडे आहेत, असे सांगून दुकानात मालक नसताना भरदिवसा दुकानदाराच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

हेही वाचा...विनोद तावडे, पंकजां मुंडेनंतर या नेत्याची लॉटरी, पक्षश्रेष्ठींकडून नवी जबाबदारी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील श्रीराम नगर येथे दत्तात्रय पवार यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. दत्तात्रय पवार यांचं घर दुकानाशेजारीच आहे. लॉन्ड्रीचालक दत्तात्रय पवार हे काही कामाने बाहेर गेले होते. पवार दुकानात नाही हे पाहून अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पत्नीला तुमच्या दुकानात आमचे कपडे आहेत, असं सांगितलं. पवार यांच्या पत्नी लॉन्ड्रीचे कपडे शोधत असताना भामट्यानं गळ्यातील तीन तोळ्याचं गंठण चोरून क्षणात पसार झाला.

लॉन्ड्री व्यवसायीक दत्तात्रय पवार यांच्या पत्नीनं सांगितलं की, दोन्ही भामटे एफ झेड मोटरसायकलवरून आले होते. तुमच्या दुकानात आमचे कपडे आहेत, असं सांगितलं. मी कपडे शोधत असताना एकान गंठण ओढलं आणि मोटारसायकलवर बसून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर आरडा ओरडा झाल्यानंतर या मोटरसायकल चोरट्यांना एका फुलवाल्या विक्रेतानं अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल वरून आलेले दोघेजण पसार झाले आहेत. सदरची घटना भर दुपारी घडल्याने या कुटुंबातील महिलेला व लॉन्ड्रीचालक दत्तात्रय पवार यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा...मुंबईत 'मातोश्री'वर आंदोलनासाठी निघालेल्या राणा दाम्पत्याला घेतलं ताब्यात

सदर घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून सदरचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 8:29 PM IST

ताज्या बातम्या