रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात झाली चोरी

रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात झाली चोरी

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे.

  • Share this:

रवी जैसवाल, प्रतिनिधी

जालना, 08 डिसेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. जालन्यातल्या भोकरदन नाक्यावरील रावसाहेब दानवे यांचं मोरेश्वर सप्लायर्स नावाचं कार्यालय चोरट्यांनी फोडलं आणि 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

बरं इतकंच नाही तर डल्ला मारण्यासाठी चोरट्यांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावला. त्याला धमकावलं. त्यानंतर तिघा चोरट्यांनी खिडकी तोडून कार्यालयात प्रवेश केला. आपले चेहरे कोणाला दिसू नये यासाठी चोरट्यांनी सगळ्यात आधी कार्यालयातील सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर कार्यालयातून १५ हजार रुपये लंपास केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला. त्यानंतर परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी 2 चोरांना अटक केली आहे. या दोघांची कसून चौकशी केली असता आपण चोरी केली असल्याची कबूली चोरट्यांकडून देण्यात आली आहे. तर पोलीस आता तिसऱ्या चोराचा तपास करत आहेत.

VIDEO : या पोलीस हवालदाराकडे पाहताना नक्कीच तुमची टोपी पडेल

First published: December 8, 2018, 3:04 PM IST

ताज्या बातम्या