मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जाणून घ्या काय आहे रस्ते सुरक्षा आठवडा!

जाणून घ्या काय आहे रस्ते सुरक्षा आठवडा!

 रस्ते सुरक्षा आठवड्याची (Road Safety Week ) गरज का आहे ?

रस्ते सुरक्षा आठवड्याची (Road Safety Week ) गरज का आहे ?

रस्ते सुरक्षा आठवड्याची (Road Safety Week ) गरज का आहे ?

  • Published by:  Renuka Dhaybar
संपूर्ण देशात ११ जानेवारी २०२० ते १७ जानेवारी २०२० हा रस्ते सुरक्षा आठवडा आहे. हा ३१वा रस्ते सुरक्षा आठवडा होता. रस्ते सुरक्षित असणे हे सगळीकडे या आठवड्याचं उद्दीष्ट होतं. याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातील. भारतातले रस्ते पूर्ण अपघात मुक्त झोन करण्यासाठी हा प्रयत्न आहे. रस्ते सुरक्षा आठवड्याची (Road Safety Week ) गरज का आहे ? 2015मध्ये भारतानं रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी शब्द दिला होता. ब्राझिलिया डिक्लरेशनवर सही करून हे ठरवलं गेलं होतं. पण 5 वर्षांनीही हे स्वप्न पूर्ण झालं नाही. 2016मध्ये कार अपघात 1.50 लाख होते. ते 2017 मध्ये 1.47 लाखावर झाले. म्हणजे कमी झाले. पण 2018मध्ये त्यात वाढ होऊन ते 1.49 लाखांवर गेले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती आहे. म्हणून रस्ते सुरक्षा आठवडा जागरुकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करते. रस्ते सुरक्षा आठवड्यात काय काय होतं? रस्ते सुरक्षा आठवड्यात पोलीस दल आणि रस्त्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संघटना 1988चा मोटार वाहन कायदा आणि 2019चा मोटार वाहन दुरुस्ती कायदा याबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवते. सरकारने तयार केलेले नियम आणि कायदे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक सेमिनार्स, मीटिंग्ज यांचं आयोजन केलं जातं. यात नुसती सावधानतेची पावलं उचलली जात नाहीत तर अनेक ठिकाणी बॅनर्स, पत्रकं यावर इमर्जन्सी काॅन्टॅक्ट नंबर्स देऊन लोकांना शिक्षित केलं जातं. मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 काय आहे? मूळ मोटार वाहन कायदा हा 1988 रोजी तयार झाला. 2019मध्ये त्यात दुरुस्ती केली गेली. परिवहन राज्यमंत्र्यांकडून आलेल्या अनेक सूचनांवर यात अमंलबजावणी केली गेली. यात नियमांचं उल्लंघन केल्यानंतरच्या दंडात वाढ, ड्रायव्हिंग लायसन्सच्या काळात 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत वाढ आणि रस्ते अपघातात सापडलेल्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवणं यांचा समावेश केला गेला. शिवाय ड्रायव्हरला लायसन्स रिन्यू करताना त्याची ड्रायव्हिंग क्षमताही सिद्ध करावी लागणार. रस्ते अपघातात मृत्यू झाला किंवा दुखापत झाली तर मिळणाऱ्या कमीत कमी नुकसान भरपाईतही वाढ करण्यात आली. सगळ्यांना माहीत असावेत असे सर्वसाधारण रस्ते सुरक्षा नियम काय आहेत? सगळेच नागरिक भारताच्या रस्ते सुरक्षेवर टीका करण्याची संधी सोडत नसतात. पण तुम्ही स्वत:च या रस्ते सुरक्षेसाठी योगदान देऊ शकता. अगदी रहदारीचे मूलभूत नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत. साधे नियम म्हणजे, ट्रॅफिक लाइट्सप्रमाणे गाडी चालवा, रस्त्यावर दाखवलेल्या चिन्ह्यांकडे लक्ष ठेवा, ड्रायव्हिंग करताना एक लाइन ठेवा, गरज असेल तेव्हा इन्डिकेटर्स वापरा, तुमचं लायसन्स संपलं असताना तुम्ही कार चालवत नाही ना, याची काळजी घ्या. ‘L’ आणि ‘baby on board’ ही चिन्ह गाडीवर असली तर बाकीच्या ड्रायव्हर्सनी विशेष काळजी घ्यायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार पार्किंग झोनमध्येच पार्क करा. या काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्यात तर तुम्ही सुरक्षेच्या रस्त्यावर ड्राइव्ह करू शकाल. #RoadToSafety  #RoadSafetyWeek #DriveResponsibly .
First published:

Tags: ROAD SAFETY CAMPAIGN

पुढील बातम्या