धक्कादायक वास्तव : देशात वर्षभरात 20 हजारांपेक्षा जास्त जणांचा अपघाती मृत्यू

धक्कादायक वास्तव : देशात वर्षभरात 20 हजारांपेक्षा जास्त जणांचा अपघाती मृत्यू

गेल्या वर्षभरात रस्ता ओलंडताना २० हजारहून अधिक पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालाय. विशेष म्हणजे ही माहिती खुद्द केंद्र सरकारनं उघड केलीय

  • Share this:

नवी दिल्ली, ता.10 ऑक्टोबर : दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही देशातील रस्ते अधिक घातक असल्याची माहिती समोर आलीय. तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र गेल्या वर्षभरात रस्ता ओलंडताना २० हजारहून अधिक पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालाय. विशेष म्हणजे ही माहिती खुद्द केंद्र सरकारनं उघड केलीय. सरकार रस्ता सुरक्षेसाठी अनेक उपाय योजना करत आहे. मात्र जोपर्यंत लोकांमधून त्याला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत अपघात थांबणार नाहीत असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघात कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे असंही सरकारने म्हटलं आहे.

रस्ता ओलांडणं जीवघेणं ?

दर 30 मिनीटात 1 मृत्यू

दर तासाला 2 ते 3 जणांचा मृत्यू

दर 24 तासात 56 जणांचा मृत्यू

वर्षभरात 20,457 जणांचा मृत्यू

  • ही आकडेवारी पाहून देशात रस्त्यावरुन प्रवास करणं किती धोकादायक झालंय हे लक्षात येतं. आज दररोज 56 निष्पाप पादचाऱ्यांचा बळी जातोय. ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढं आलीय. गेल्या वर्षी रस्ता ओलांडताना देशात 20,457 जणांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे 2014 ते 2017 या तीन वर्षात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्या पादचाऱ्यांचं प्रमाण तब्बल ६६ टक्क्यांनी वाढलंय.

  • 2014 मध्ये रस्ते अपघातात 12,330 पादचारी ठार झाले होते.  तर 2017 मध्ये  20,457 जणांचा मृत्यू झालाय.

  • देशाचा विचार केल्यास तामिळनाडूमध्ये रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.

  • तमिळनाडूत सर्वाधिक 3,507 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय.

  • धक्कादायक बाब म्हणजे पादचाऱ्यांप्रमाणेच,सायकल स्वार, दुचाकी चालकांच्या मृत्युचं प्रमाण अधिक आहे.

  • 2017 मध्ये 10 सायकल स्वार तर 133 दुचाकी चालकांचा अपघातात मृत्यू झालाय.

जबाबदार कोण?

या रस्ते अपघातांना वाहनचालकांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं समोर आलंय. रस्ते अपघातांना रस्त्यांवरचं अतिक्रमण जबाबदार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव वाय.एस.मलिक यांनी संगीतलंय. पदपथांवरील अतिक्रमणांमुळं पादचाऱ्यांवर पायी चालण्याची वेळ येते आणि त्यामुळं अपघात होतात.या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना तसेच रस्त्यांवरुन प्रवास करताना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

असे होतात अपघात

2014 : 12,330 पादचाऱ्यांचा मृत्यू

2017 : 20,457 पादचाऱ्यांचा मृत्यू

2017 : तामिळनाडूत 3,507 जणांचा मृत्यू

2017 : महाराष्ट्रात 1831 जणांचा मृत्यू

 

 

VIDEO : फुटओव्हर ब्रिजचा भाग ठेवताना क्रेन कोसळली

First published: October 8, 2018, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading