मुंबई, 26 मे- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहिली. वडिलांच्या आठवणीत त्याने विलासराव यांचा जुना फोटो शेअर केला आणि त्या फोटोला ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.. मला तुमची आठवण येते’ असं कॅप्शनही दिलं.
सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूर
View this post on Instagram
विवेक ओबेरॉयच्या त्या ट्वीटचं उत्तर देणार होता अभिषेक, ऐश्वर्याने घेतला हा निर्णय
रितेशसोबतच जेनेलिया देशमुखनेही दिवंगत नेते विलासराव यांचा आठवणीतला एक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. ‘ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्यापासून कधीच दूर जात नाहीत. ते नेहमीच आपल्या सोबत असतात फक्त ते दिसत नाहीत... त्यांचा आवाज येत नाही.. पण ते सोबतच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.’ आपल्या पोस्टमध्ये जेनेलियाने लिहिले की, ‘कधी कधी मी आकाशात पाहते आणि हसत म्हणते की, मला माहितीये तुम्ही आहात... तुमची फार आठवण येते.’ १४ ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
...म्हणून चक्क 6 वर्षांच्या मुलीच्या पाया पडल्या रेखा
अक्षयच्या मुलावर सलमानचा फीवर, ‘तेरे नाम’ अवतारात दिसला एअरपोर्टवर
काही दिवसांपूर्वी पीयुष गोयल यांनी विलासरावांवर आरोप करत म्हटलं होतं की, २००८ मध्ये जेव्हा २६/११ चा हल्ला झाला तेव्हा विलासराव आपल्या मुलासाठी निर्मात्यांना भेटण्यात व्यग्र होते. यावर गोयल यांना प्रत्युत्तर देताना रितेश म्हणाला होता की, ‘जे या जगात नाहीत त्यांच्यावर आरोप करणं योग्य नाही.’
मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.