त्या चुकीसाठी रितेश देशमुखला खाव्या लागतात चपला; व्हिडीओद्वारे सांगितली व्यथा

त्या चुकीसाठी रितेश देशमुखला खाव्या लागतात चपला; व्हिडीओद्वारे सांगितली व्यथा

या व्हिडीओमध्ये रितेशनं चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकून तुम्ही देखील खळखळून हसाल. (funny video viral)

  • Share this:

मुंबई 16 एप्रिल: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. गंमतीशीर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांचं मनोरंजन करतो. यावेळी देखील त्यानं असाच एक गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकून तुम्ही देखील खळखळून हसाल. (funny video viral)

रितेशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जर तू सकाळी उशीरा उठलास तर तुला काय खायला मिळतं? असा सवाल त्याला एका चाहत्यानं केला होता. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता त्यानं चप्पल असं उत्तर दिलं. त्याची हा व्हिडीओ इन्स्टाग्रामसोबतच इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील खळखलून हसाल.

अवश्य पाहा - तारक मेहताला पुन्हा एकदा कोरोनाचा फटका; भीडे गुरुजींनंतर आणखी 4 जण पॉझिटिव्ह

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

यापूर्वी त्यानं पोलिसांची स्तुती करणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. करोनामुळे घरात थांबलेल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क पोलिसांनी हजेरी लावली होती. एका मुलाचा वाढदिवस होता. मात्र करोना विषाणूमुळे त्याचे मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी आले नाही. अखेर नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वडिलांनी चक्क पोलिसांना फोन केला. आश्चर्चचकित करणारी बाब म्हणजे पोलिसांनी देखील त्यांच्या विनंतीचा आदर राखत या मुलाला थेट घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Published by: Mandar Gurav
First published: April 16, 2021, 12:44 PM IST

ताज्या बातम्या