मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'बर्ड फ्लू'चा धोका वाढला! देशाच्या 7 राज्यांमध्ये पसरला

'बर्ड फ्लू'चा धोका वाढला! देशाच्या 7 राज्यांमध्ये पसरला

महाराष्ट्रासहीत उत्तरप्रदेश, गुजरात, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा या राज्यांत बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका (Risk) वाढत चालला आहे. काल शनिवारी पूर्ण देशात 1200 पेक्षा अधिक पक्षांचा मृत्यू (Bird death) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 जानेवारी: कोरोना पाठोपाठ आता बर्ड फ्लू (Bird Flue) चा धोका देशभर वाढत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत पक्षांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत देशभरात अनेक पक्षी एका संदिग्ध आजाराने मृत पावले आहेत. काही राज्यांत पक्षांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण काही ठिकाणी चाचणीचा रिपोर्ट येणं बाकी आहे. असं असलं तरी देशातील एकूण सात राज्यांत बर्ड फ्लू पसरल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रासहत उत्तरप्रदेश, गुजरात, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा या राज्यांत बर्ड फ्लूचा धोका वाढत चालला आहे. काल शनिवारी पूर्ण देशात 1200 पेक्षा अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या राजधानीत जिवंत पक्षांच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. तसेच गाजीपूर कुक्कुट बाजार पुढील दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका संबंधित व्यवसायिकांना बसत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पक्षांच्या होणाऱ्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू हा आजार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांत विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणांत मृत पक्षी आढळत आहेत. मात्र या राज्यांत अद्याप बर्ड फ्लू असल्याचं ठोस निदान झालेलं नाही. इथल्या पक्षांचे काही नमुने चाचणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतर या पक्षांच्या मृत्यूमागचं कारण स्पष्ट होऊ शकेल. या व्यतिरिक्त केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा  आणि गुजरात या राज्यांत बर्ड फ्लू पसरल्याची माहिती देण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये शनिवारी एकूण 350 पक्षांचा मृत्यू झाला असून या राज्यातील मृत पक्षाची संख्या आता 2,512 वर पोहचली आहे. तर  गुजरातमधील बर्ड फ्लूच्या पहिल्या घटनेची खात्री झाल्यानंतर, राज्यातील जुनागड जिल्ह्यातील मंगरोळ तालुक्यातील एका गावात चार कावळ्यांचा संदिग्ध मृत्यू झाल्यानंतर या आजाराची दहशत वाढली आहे. शुक्रवारी राज्यात दोन टीटव्यांचा मृत्यू झाला होता, या दोन्ही पक्षांची चाचणी केल्यानंतर यातील एका पक्षामध्ये संबंधित रोगाचे विषाणू आढळले आहेत.

First published:

Tags: Bird flu, Maharashtra, Virus