जीवन मरणाशी लढत होते ऋषी कपूर, रणबीरनं सांगितलं वडिलांच्या मनात काय होतं

जीवन मरणाशी लढत होते ऋषी कपूर, रणबीरनं सांगितलं वडिलांच्या मनात काय होतं

एका अवॉर्ड फंक्शनमध्ये वडिलांच्या मनातली गोष्ट सांगताना रणबीर खूपच इमोशन झाला होता.

  • Share this:

मुंबई, 02 मे : इरफान खानच्या निधनाचा एक धक्का पचत नाही तो पर्यंत बॉलिवूडनं अवघ्या काही तासांत दुसरा सुपरस्टार गमावला. जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईमध्ये निधन झालं. मागच्या वर्षभरापासून ते न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते आणि काही महिन्यापूर्वीच ते भारतात परतले होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असतानाच काल रात्री त्यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्याठिकाणी त्यांची प्राणज्योत मालावली.

ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत मात्र अनेक दशकांचं त्यांचं सिनेसृष्टीतील योगदान मात्र कायमचं अजरामर झालं. 2019 च्या अखेरीसच ऋषी कपूर कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले होते. ते एक असे अभिनेता होते. जे त्यांच्या कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा कामाबद्दल काळजी करत होते. याचा खुलासा त्यांच्या मुलानं म्हणजेच रणबीर कपूरनं स्वतः केला होता. एक अवॉर्ड फंक्शनमध्ये रणबीर म्हणला होता, ते ट्रीटमेंट दरम्यान नेहमी एकच गोष्ट विचारत असत की मी ठिक होऊन घरी जाईन ना? मला यानंतर कोणी काम देईल का? मला माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल का?

रणबीर म्हणाला होता की, ते नेहमीच फिल्म इंडस्ट्रीबद्दलच बोलत असायचे. ते त्यावेळी त्यांचा देश आणि त्यांच्या बॉलिवूडमधील कामाला खूप मिस करत होते. अवॉर्ड फंक्शनमध्ये वडीलाच्या मनातली गोष्ट सांगताना रणबीर खूपच इमोशन झाला होता. ऋषी कपूर यांच्या या कॅन्सरच्या लढाईमध्ये त्यांच्या कुटुंबानं त्यांना पूर्ण साथ दिली होती. त्यांची पत्नी तर नेहमीच त्यांच्या सोबत होती.

First published: April 30, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या