ऋषी कपूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागितल्या या 3 गोष्टी

ऋषी कपूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागितल्या या 3 गोष्टी

ऋषी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या तीन नेत्यांना टॅग करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या या मागण्यांना त्यांचे फॉलोअर्सही पाठिंबा देत आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, 28 मे- देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा बहूमताने विजय झाला. एकीकडे भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना शुभेच्छा देत आहेत तर दुसरीकडे अभिनेते ऋषी कपूर भारतातील राजकीय घडामोडींवर नजर ठेवून आहेत. ऋषी यांच्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये दुर्दम्य आजारावर उपचार सुरू आहेत. त्यांनी तिथूनच मोदी यांच्याकडे तीन गोष्टींची मागणी केली आहे.

ऋषी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या तीन नेत्यांना टॅग करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या या मागण्यांना त्यांचे फॉलोअर्सही पाठिंबा देत आहेत. ऋषी यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप, अरुण जेटली, स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी एक मागणी आहे की, त्यांनी निःशुल्क शिक्षा, चिकित्सा, पेंशन या गोष्टींवर काम केलं पाहिजे. हे कठीण आहे. पण, तुम्ही आजपासूनच याच्यावर काम करायला घेतलं तर आपलं हे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल.’

रितेश देशमुखने हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची घेतली शाळा, ट्विटरवर शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

आपल्या तीन मागण्या सांगण्यासाठी ऋषी यांनी चार ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी आपलं मत सविस्तर लिहित म्हटलं की, ‘मी इथलं शिक्षण पाहिलं आणि इथल्या रुग्णालातील विशेष सोयींना पाहून मी हा विचार करतो की फार कमी लोकांनाच या सुविधा का मिळतात? विशेष म्हणजे इथले अनेक डॉक्टर भारतीय आहेत. नोटबंदी.. गोरक्षा यांसारखे मुद्दे माझ्या प्रश्नांच उत्तरं नाहीये.’

HSC result : 'परश्या.... आर्ची पास झाली रे...', पाहा रिंकूचा निकाल

ऋषी यांनी पुढील ट्वीटमध्ये लिहिले की, ‘तुमच्याकडे पुन्हा एकदा पाच वर्ष आहेत. कृपया यावर विचार करा आणि माणुसकीसाठी सर्वोत्तम काम करा. अरुण जेटली, स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मी जर वाजवीपेक्षा जास्त बोललो असेन तर मला माफ करा. पण भारताचा एक नागरिक या नात्याने मला हे माझं कर्तव्य वाटलं.’

VIDEO- ‘तिने गोड खाणंच नाही तर मलाही रिजेक्ट केलंय’, सलमानने सांगितलं त्याच्या मनातलं दुःख

बॉलिवूड अभिनेते ऋषी गेल्यावर्षी उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले होते. तिथे त्यांच्यावर उचार झाले. सध्या त्यांची तब्येत चांगली असली तरी भारतात यायला त्यांना अजून काही महिने लागतील. ऋषी यांच्यावर सप्टेंबर २०१८ पासून उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संपूर्ण काळात पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबत होती. तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी न्यूयॉर्कला जाऊन त्यांची आवर्जुन भेट घेतली.

थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...

First published: May 28, 2019, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading