VIRAL VIDEO- जेव्हा पोलार्डच्या चेंडूवर एक हाताने ऋषभ पंत मारतो सिक्स

VIRAL VIDEO- जेव्हा पोलार्डच्या चेंडूवर एक हाताने ऋषभ पंत मारतो सिक्स

ऋषभ पंत आणि शिखर धवनने दमदार फलंदाजी करत भारताचा विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला

  • Share this:

चेन्नई, १२ नोव्हेंबर २०१८- भारत आणि वेस्टइंडीजच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिखर धवनने त्याच्या टी२० करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी खेळली. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ऋषभ पंतने. ५८ धावांची त्याच्या तुफानी खेळीमुळे भारत तिसरा सामना जिंकला. पंतने या सामन्यात काही रेकॉर्डही बनवले.


या सामन्यात पंतने त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक झळकावले. पंतने ५ चौकार आणि ३ षटकार लगावत ३७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्या ५८ धावांच्या खेळीत सोशल मीडियावर सर्वात चर्चेचा विषय ठरला तो त्याचा एकहाती षटकार.


भारताच्या डावात १३ व्या षटकात पोलार्डच्या गोलंदाजीवर पंतने एकहाती षटकार लगावला. पोलार्डने त्याच्या षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ स्टंपवर फूल लेंथने फेकला. पंतने आपल्या उजव्या हाताने बॉटम हँड शॉट लगावला. त्याच्या या शॉटने भारताच्या खात्यात ६ धावा जमा झाल्या.


वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या. १८१ धावांचा पाठलाग करत असताना भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ४ धावा करून झटपट बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुल मैदानात आला मात्र तोही फार काळ टिकू शकला नाही. लोकेश राहुल १७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि शिखर धवनने दमदार फलंदाजी करत भारताचा विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.
शिखर धवनने ६२ चेंडूत २ षटकार आणि १० चौकार लगावत ९२ धावा केल्यात. मात्र, अखेरच्या षटकात विजयी षटकार लगावण्याच्या नादात तो झेलबाद झाला. तर ऋषभ पंतने ३८ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकार लगावत ५८ धावा केल्यात. अखेरच्या षटकात मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने १ धाव काढून विजयाची औपचारिक्ता पूर्ण केली.


फलंदाज निकोलस पूरणच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि डेरेन ब्रावोच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या बळावर विंडीजने १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. निकोलस पूरणने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार लगावत अर्धशतक झळकावले. ओपनिंग जोडी होप्स आणि हेटमायरने सावध सुरुवात करत ५१ धावांची भागिदारी केली. पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकार दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. अशात सातव्या षटकात रोहित शर्माने मोठे बदल केले. चहलने आपल्या पहिल्या षटकात करिष्मा दाखवत शाई होपला बाद करून रोहित शर्माची मोठी डोकेदुखी दूर केली.


चहलच्या गोलदांजीवर षटकार लगावण्याच्या नादात होपने वॉशिंगटन सुंदरच्या हातात झेल दिला. होप २२ चेंडूत २४ धावा करू शकला. चहलने पुढच्या षटकात वेस्टइंडीजला दुसरा झटका दिला. त्याने हेटमायरला २६ धावांवर क्रृणाल पांड्याला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर दिनेश रामदीन १५ धावा करून स्वस्तात बाद झाला. तर दुसरीकडे निकोलस पूरण आणि डेरेन ब्रावो फटकेबाजी सुरूच ठेवत धावफलक वाढवला. निकोलसने नाबाद ५३ तर ब्रावोने नाबाद ४३ धावा करून विंडीजचा धावफलक १८१ पर्यंत पोहोचवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 06:49 PM IST

ताज्या बातम्या