अॅडलेड, 3 मार्च : क्रिकेटच्या मैदानावर अनेक चांगले, वाईट विक्रम होत असतात. तर कधी कधी क्षेत्ररक्षण करताना किंवा फलंदाजी करताना अशा काही घटना आश्चर्यकारक घटना घडतात कि ज्यामुळे सर्वचजण चकित होतात. आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला यांच्यात झालेल्या सामन्यावेळी न्यूझीलंडची क्रिकेटर केटी पर्किन्स ज्या पद्धतीने बाद झाली त्याला पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
न्यूझीलंडचा संघ सुस्थितीत असताना केटी पर्किन्स बाद झाली. पर्किन्स स्ट्राईकला असताना केटी मार्टिन्स दुसऱ्या बाजूला होती. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज हीथर ग्राहमने टाकलेल्या चेंडूवर पर्किन्सने जोरदार फटका मारला. त्यावेळी दुसऱ्या बाजुला असलेली मार्टिन्स धाव घेण्यासाठी पळाली. तेव्हा पर्किन्सने मारलेला चेंडू थेट मार्टिन्सच्या बॅटवर आदळला. त्यानंतर उंच उडालेला चेंडू हिथर ग्राहमच्या हातात विसावला आणि पर्किन्स झेलबाद झाली.
पर्किन्स बाद झाली यावर मैदानातील कोणालाच विश्वास बसत नव्हता. अनपेक्षितपणे मिळालेल्या या विकेटने ऑस्ट्रेलियन संघ आनंदात होता. त्यानंतर न्यूझीलंडची फलंदाज मार्टिन्सचे त्यांनी आभारही मानले. पंचांनाही हा निर्णय देण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली.
या सामन्यात न्यूझीलंडने 323 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले. केटी मार्टिन्सने 69 चेंडूत 76 धावा केल्या. ऑस्ट्रेलियालाच्या संघाला मात्र 38.2 षटकांत सर्वबाद 257 धावांपर्यंत मजल मारली.
Oh WOW! Katey Martin helps Heather Graham pick up one of the most bizarre dismissals you'll ever see in the Governor General's XI match! 😱 pic.twitter.com/fSV3GJkjyA
— Australian Women's Cricket Team 🏏 (@SouthernStars) February 28, 2019