तांदूळ खेचणारा 5 हजार कोटींचा धातू, भामट्यांच्या करामतीने पोलीसही चक्रावले

तांदूळ खेचणारा 5 हजार कोटींचा धातू, भामट्यांच्या करामतीने पोलीसही चक्रावले

अटकेत असलेल्या या टोळीने राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण संशोधन करीत असल्याचं भासवतं होते.

  • Share this:

सत्यम सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 24 डिसेंबर : 'या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइटमध्ये करण्यात येतो' असं सांगून कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.   मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे राईस पुलरच्या नावाखाली 3 जणांना जवळपास दीड  कोटींना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक  केली आहे. अटकेत असलेले आरोपी हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना फसवण्याचं काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मुंबईच्या  बोरिवली आणि विविध  परिसरात काही  इसम कॉपर इरेडियम या दुर्मिळ धातूचा वापर करून 'राईस पुलर'चे सर्वेक्षण करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 11 ला मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 3 लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इक्युपमेंट, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के, ओळखपत्रे, केमिकल्स बॉटल, मोबाईल फोन  हस्तगत केले आहेत.

काय आहे राईस पुलर?

अटकेत असलेल्या या टोळीने राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण संशोधन करीत असल्याचं  भासवतं होते. कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइट, लाँच व्हेईकलमध्ये करण्यात येतो. त्यामुळे त्याची मोठी मागणी असल्याचं ही टोळी भासवत होती. यासाठी या टोळीने International Venus Metal आणि Avon Metal Organisation  या बनावट कंपन्या स्थापन करून त्यांची वेबसाईट सुद्धा सुरू केली होती. कॉपर इरेडियमने तांदळाचा एक तुकडा 1 इंचावरून स्वतःकडे खेचल्यास त्याची किंमत प्रति नग 5 हजार कोटी मिळत असल्याचं आरोपी गुंतवणूक दारांना सांगत होते.

कॉपर इरेडियममध्ये अल्फा बिटा, गामा सारखी किरणे उत्सर्जित आणि आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं त्याचं परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केले जाऊ शकतं. मात्र, आतापर्यंत टप्याटप्यात करण्यात आलेल्या संशोधनाला भारताच्या डीआरडीओ आणि सुरक्षा मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचं ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखवत आली होती.

संशोधन पूर्ण झाल्यावर अनेक कंपन्या हे कॉपर इरेडियम विकत घेतील आणि त्यातून संशोधनात पैसा गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपये मिळतील असं आमिष ही टोळी दाखवत होती.

ही टोळी मुंबई आणि जवळपासच्या परिसरात सक्रीय असून अनेकांना त्यानी फसवणूक केली आहे. सध्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहेत. मात्र, हे एक मोठं रॅकेट असून त्यात अनेक जण गुंतलेले असल्याची माहिती समोर येत आहे.

त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे. मात्र, अशा प्रकारे अजून कुणाला जर या टोळीने फसवलं असेल तर त्यांनी मुंबई पोलीस गुन्हे शाखा 11 मध्ये संपर्क करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2019 08:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading