रॉयल्टी चोरांनी महसूल विभागाला लावला लाखो रुपयांचा चुना, मुंबईला येणाऱ्या 4 ट्रकवर छापे

रॉयल्टी चोरांनी महसूल विभागाला लावला लाखो रुपयांचा चुना, मुंबईला येणाऱ्या 4 ट्रकवर छापे

या चारही ट्रक चालकांवर प्रत्येकी किमान सव्वा लाख रुपये दंडाची आकारणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 13 मे : महसूल यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्याचा फायदा घेत रॉयल्टी चोरांनी माती, दगड, रेती, खडी आदी गौणखनिजाची विना रॉयल्टी वाहतूक करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाची हानी केल्याचे प्रकार समोर आला आहे. या विरोधात भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी महसूल यंत्रणेला रॉयल्टी चोरांविरोधात धडक कारवाईचे आदेश देऊन रॉयल्टी वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

यानुसार, पडघा मंडळ अधिकारी किरण केदार आणि नांदकर तलाठी अविनाश राऊत यांच्या महसूल पथकाने सावद नाका इथे छापा टाकून विना रॉयल्टीने मातीने भरलेले चार ट्रक मुंबईच्या दिशेने निघाले असता त्यांना पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केलं आहे.

या चारही ट्रक चालकांवर प्रत्येकी किमान सव्वा लाख रुपये दंडाची आकारणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्रक मालकांनी जर वेळेत उपस्थित राहून दंडात्मक रक्कम भरली नाही तर या चारही ट्रकमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती नायब तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली आहे.

पुण्यात चोरांचा कहर, मंदिरातून रामाच्या पायातले चाळ केले लंपास!

पुण्यातील तुळशीबागमध्ये असणाऱ्या राम मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. चोरट्यांची इतकी मजल वाढली की त्यांनी चक्क देवाच्या अंगावरील दागिनेच चोरले होते. मंदिरात असलेल्या रामाच्या आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ तसंच पुजार्‍याचा मोबाईलदेखील चोराने चोरले.

या संपूर्ण प्रकाराबद्दल परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीबागेतील रामाच्या मंदिरात 1 तारखेला सकाळी 7 वाजताच्या सुमारास मंदिरातील पुजारी संकेत मेहेंदळे हे नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यावर पूजा करण्यासाठी नळावर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान चोरी झाली असल्याचं सांगण्यात आलं होतं.

साधारण 25 वय असलेल्या तरुणाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन रामाच्या आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ चोरले. या चाळांचं वजन प्रत्येकी 150 ग्रॅम असं दोन्ही मिळून 300 ग्रॅम वजनाचे 11 हजार 400 रुपये किमतीचे चाळ चोरून नेले होते. तर गाभाऱ्यातील पुजार्‍याचा मोबाईलदेखील चोरून नेल्याची घटना घडली होती.

पुण्यात हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणावर गोळीबार, धक्कादायक CCTV आला समोर

 

First published: May 13, 2019, 4:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading