निवृत्त मेजरने भरचौकात सरपंचावर केला गोळीबार!

निवृत्त मेजरने भरचौकात सरपंचावर केला गोळीबार!

पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर इथं सरपंचावर गोळीबार केल्याची धक्कायदायक घडना घडली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 17 डिसेंबर : पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर इथं सरपंचावर गोळीबार केल्याची धक्कायदायक घडना घडली आहे. या गोळीबारात सरपंच संजय दहिफळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

सायंकाळी साडेसहा वाजता गावातील मुंढे चौकामध्ये सेवानिवृत्त मेजर शहादेव दहीफळे यांनी सरपंच संजय दहीफळे यांच्यावर त्यांच्याजवळील पिस्तुला मधून गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे संजय दहिफळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथमतः पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आल्याचं समजतं.

याबाबत घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यासह पोलीस फौजफाटा घटना ठिकाणी दाखल झाला असून आरोपी शहादेव दहिफळे हा गावातून पसार झाला आहे. या घटनेनंतर गावामध्ये तणावपूर्ण परंतु, शांततापूर्ण वातावरण आहे.

आरोपी शहादेव दहिफळे याने गोळीबार केला? यामागे काय कारण होतं, याचा पोलीस तपास करत आहे.

==================

Published by: sachin Salve
First published: December 17, 2019, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading