मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाविरुद्ध आता सेवानिवृत्त जवानही मैदानात, विनामोबदला बजावत आहे कर्तव्य

कोरोनाविरुद्ध आता सेवानिवृत्त जवानही मैदानात, विनामोबदला बजावत आहे कर्तव्य

कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्यासोबतच आता सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड देखील मैदानात उतरले आहेत.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्यासोबतच आता सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड देखील मैदानात उतरले आहेत.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्यासोबतच आता सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड देखील मैदानात उतरले आहेत.

मालेगाव, 3 मे: अदृश्य शत्रू अर्थात कोरोनाविरुद्धच्या युद्धात अनेक जण उतरले आहेत. सगळ्यांचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे कोरोनाला देशातून हद्दपार करणे. या युद्धात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्यासोबतच आता सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड देखील मैदानात उतरले आहेत. 30 जवान आणि 35 होमगार्ड मनमाड शहरात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत. तेही विनामोबदला. कर्तव्याच्या बदत्यात कोणतीही अपेक्षा या कोरोना वॉरियर्सनी ठेवलेली नाही. 'आम्ही सैनिक आहोत आणि देशसेवा आमच्या रक्तात आहे. देश आणि शहरावर कोरोनाचा संकट आल्यावर घरात कसं बसणार,' अशी भावना सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्डनी व्यक्त केली आहे. हेही वाचा..मद्यपींना खूशखबर! मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप 'भारत माता की जय' या घोषणा देणारे सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे 22 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला.अगोदर पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचे पाहून त्यांच्या मदतीला सेवानिवृत्त जवान आणि होमगार्ड धावून आले. मनमाड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून विनामोबदला आपलं कर्तव्य बजावत देशसेवा करत आहे. संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्याला देशातून हद्दपार करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार, इतर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्यासोबत सेवानिवृत्त लष्करी जवान आणि होमगार्ड देखील मागे नाही. हेही वाचा..Lockdown : 72 वर्षांची महिला 500 रुपयांसाठी रात्रभर चालली आणि बँकेत पोहोचताच... दुसरीकडे, मालेगावात कोरोनाचं संकट कायम आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकट्या मालेगावात गुरुवारी 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यात 3 महिन्यांची बालिका, 2 वर्षांचा मुलगा आणि 13 पोलिसांचा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 274 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कठोर निर्देश दिले आहेत. मालेगावात अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस सुरू करावी. प्रशासन मदत करणार करावी. कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्येही नॉन कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
First published:

Tags: Corona, Coronavirus, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या