ढोल ताशा पथकांवरचे निर्बंध पुणेकर पाळणार का?

25 जुलै पासून वादनाचा सराव सुरु करावा असं खुद्द पोलीस आयुक्तानी बजावलं असतानाही अनेक मंडळांनी जून महिन्यापासूनच सराव सुरू केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2017 09:57 AM IST

ढोल ताशा पथकांवरचे निर्बंध पुणेकर पाळणार का?

अद्वैत मेहता,पुणे

07 जुलै : दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणेश उत्सवाच्या मिरवणुकात सहभागी होणाऱ्या ढोल ताशा पथकांवर पोलिसांनी निर्बंध घातल्यानं पुन्हा वाद विवाद होण्याची चिन्हं आहेत.25 जुलै पासून वादनाचा सराव सुरु करावा असं खुद्द पोलीस आयुक्तांनी बजावलं असतानाही अनेक मंडळांनी जून महिन्यापासूनच सराव सुरू केलाय.

देश विदेशात आकर्षण असलेल्या पुण्याच्या गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली ढोल ताशा पथकं म्हणजे सळसळत्या तरुणाईच्या ऊर्जेचं प्रतीक.सुरुवातीला हाताच्या बोटावर आणि मानाच्या गणपतींपुरती मर्यादित असलेली ढोल ताशा पथकं आता शेकड्याच्या संख्येनं आहेत. हजारो तरुण, तरुणी, शाळकरी विद्यार्थी, महिला, लहान मुलं गणेश उत्सवाची शान असणाऱ्या पथकात सहभागी होतात,खास करून आयटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले लोकं खास वेळ काढून 2,3 महिने कसून सराव करतात

पण ढोल ताशा वादनामुळे होणाऱ्या  ध्वनी प्रदूषणाचा ,जमणाऱ्या गर्दीचा फटका आजारी माणसं,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांना व्हायला नको म्हणून पोलिसांनी  गेल्या काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांवर निर्बंध घालायला सुरुवात केलीय.

यंदा पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ढोल ताशा पथकांसाठी पंचसूत्री अर्थात 5 नियम लागू केलेत.

Loading...

1.ढोल ताशा पथकांनी 25 जुलै नंतर सरावाला सुरुवात करावी.

2.सराव पथकात 25 ढोल 5 ताशांचा समावेश असावा.

3.सराव संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत करावा.

4.पथकातील तरुणींच्या सुरक्षेची जबाबदारी पथकप्रमुखाने घ्यावी.

5.पर्यावरणाचे नियम पाळावेत.

अर्थातच जून पासून सराव सुरू केलेल्या ,पथकात शेकडोंच्या संख्येनं सहभागी असलेल्या तरुण तरुणींना आणि त्यांच्या पालकांनाही हे नियम जाचक वाटत आहेत.

यंदा पुण्यातील अनेक गणेश मंडळांचं शतकोत्तरकत्तर रौप्य महोत्सवी म्हणजे 125वं वर्ष आहे. त्यामुळे ढोल ताशांचा दणदणाट जरा जास्तच असेल.

खुद्द महापालिकेनं उत्सवासाठी यंदा 2 कोटी निधीची तरतूद बजेटमध्ये केलीय. याशिवाय दगडूशेठ गणपती मंडळातर्फेही कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

त्यातच गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हेही रद्द करण्यात येणार आहेत.

एकूणच काय तर पोलिसांनी आणि न्यायालयांनी घालून दिलेले नियम,निर्बंध कागदावर राहणार,पायदळी तुडवले जाणार यात कुणालाही शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...