S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी

गरिब, आदिवासी शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाघिणाला मारल्याचं दुःख सर्वांनाच आहे

Updated On: Nov 9, 2018 04:33 PM IST

मुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी

नागपूर, ०९ नोव्हेंबर २०१८- एकीकडे अवनी वाघिणीच्या हत्येनंतर वनविभाग आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. सुधीर मुनगंटीवार हे तर खरे वाघमित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे राजीनामा मागण्याचा तर प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य गडकरींनी केलं. तसंच गरिब, आदिवासी शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाघिणाला मारल्याचं दुःख सर्वांनाच आहे पण त्याऐवजी दुसरा कोणता पर्यायही नव्हता असंही गडकरी नागपूरमधील पत्रकार परिषदेत म्हणाले.


चहुबाजूंनी सध्या मुनगंटीवारांवर टीका होत असताना, राहुल गांधींनीही यात उडी टाकली आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राहुल गांधींनी सरकारवर टीका करत उपदेशाचे डोस पाजले होते. एकीकडे राहुल गांधी सरकारवर टीका करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी या हत्येचं समर्थन केलं आहे. माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके आणि काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी वनविभागाची पाठ थोपटली. निष्पाप लोकांना मारणाऱ्या वाघिणीला ठार करणं गरजेचंच होतं, असं मत या दोघांनीही व्यक्त केलं.दरम्यान, टी-१ अर्थात अवनी वाघिणीला मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. न्यूज १८ लोकमतच्या हाती अवनी वाघिणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती लागला होता. या शवविच्छेदन अहवालमध्ये अवनीला बेशुद्ध करण्यात आलंच नव्हतं असं स्पष्ट झालं. यवतमाळच्या राळेगाव मधील जंगलात वनविभागाच्या बचाव पथकाने अवनीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलाच नाही. टी वन वाघिणीच्या मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात ही बाब आता उघड झाली आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेला डार्ट शरीरात गेलाच नव्हता त्यामुळे अवनीचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.


'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2018 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close