मिठागराच्या जमिनीवर परवडणारी घरे, रामदास कदमांचा विरोध

मिठागराच्या जमिनीवर परवडणारी घरे, रामदास कदमांचा विरोध

मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडाडून विरोध केला

  • Share this:

मुंबई, 16 मे : मिठागराच्या जमिनीवरील परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा राज्य सरकारने प्रस्ताव सादर केलाय.  मात्र या प्रस्तावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विरोध केलाय.

मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेला राज्याचे पर्यावरण मंत्री  रामदास कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडाडून विरोध केला. मुंबईचे पर्यावरण धोक्यात आणणारे आणि केवळ बिल्डरांच्या नफ्यासाठी आखलेले हे धोरण म्हणजे केवळ धूळफेक असून, गरिबांची ढाल करून त्यांना बनवण्याचा प्रकार आहे.

मुंबईच्या पर्यावरणात यामुळे बिघाड होईल आणि मुंबईला अधिक त्रास होईल त्यामुळे खार जमिनी सरकारी धोरणाच्या नावाखाली गिळंकृत करू देणार नाही, असा इशारा त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिला.

या पूर्वीही महाराष्ट्रात कमाल जमीन नागरी कायदा रद्द करून शासनाने अशीच धूळफेक केली होती. तेव्हा एकट्या शिवसेनेने त्यास विरोध केला होता.

शासनात बसलेले काही अधिकारी अशीच बिल्डर धार्जिणी धोरणे आखतात आणि राज्याच्या जनतेला भूलथापा देऊन बनवतात. मुंबईच्या पर्यावरणाला नख लावण्याचा प्रकार शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि यशस्वीही होऊ देणार नाही असा मुद्दाही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या प्रसंगी मांडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading