रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरण: MIM नगरसेवक तौफिक शेखला अटक

रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरण: MIM नगरसेवक तौफिक शेखला अटक

काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांच्या हत्ये प्रकरणी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

सोलापूर, 2 जून: काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांच्या हत्ये प्रकरणी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख याला अटक करण्यात आली आहे. शेख याला कर्नाटक पोलिसांच्या पथकाने सोलापूर परिसरातून अटक केली आहे.

शेख याच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार करणाऱ्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. त्याआधी त्या काही दिवस बेपत्ता होत्या. नंतर सोलापूरच्या विजयपूर परिसरात त्यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रेश्मा यांनी विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर आलेल्या हत्येमुळे संशय शेख याच्यावरच होता. पोलिसांनी या घटनेप्रकरणी प्रथम अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौकशी दरम्यान शेख हत्या झाल्यानंतर लगेच बेपत्ता झाल्याने तोच या मागे असल्याचे समोर आले होते.

पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या केल्याचे शेख याने सांगितले. दरम्यान त्याला उद्या विजापूर कोर्टात हजर केले जाणार आहे.

VIDEO : एक होती स्वीडनला तर दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनंतर झाली दोन बहिणींची भेट!

First published: June 2, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading