Xiaomiचे मोबाईल झाले 6 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Xiaomiचे मोबाईल झाले 6 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Xiaomiच्या वेबसाईटवर आज प्रजासत्ताक दिनानिमत्तानं खास Republic Day Sale आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी: Xiaomiच्या वेबसाईटवर आज प्रजासत्ताक दिनानिमत्तानं खास Republic Day Sale आहे. या सेलचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं 6 हजार रुपयांची सूट तुम्हाला मोबाईल खरेदीवर मिळणार आहे. शाओमी कंपनीच्या वेबसाईटवर आज 6 हजार रुपयांनी स्वस्त मोबाईल तुम्ही खरेदी करू शकणार आहात. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घेणार असला किंवा जुना एक्सचेंज करणार असाल तर आजची संधी सोडू नका.

Redmi Note 8 Pro- या मोबाईल तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुम्हाला एक हजार रुपयांचा अॅडिशनल डिस्काऊंट मिळू शकतो. Redmi Note 8 Pro 6GB64GB आणि 8128 GB स्टोअरेज असे दोन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत मिळणार आहे. 648 मेगापिक्सल कॅमेरा आणि 4500 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल.

Redmi K20 Series

शाओमी सिरिजमध्ये K20 आणि K20 pro अशा दोन मोबाईलवर डिस्काऊंट मिळणार आहे. या मोबाईलवर 4 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय 1 हजार रुपयांपर्यंत इतर डिस्काऊंट आणि कॅशबॅक अशा धमाका ऑफर्सचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे.

Redmi Note 8- Republic Day Sale मध्ये 4 कॅमेरा असलेला आणि जास्त फीचर्स 10 हजार रुपयांपर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी सगळ्यात मस्त मोबाईल आहे. हा फोन तुम्हाला 9999 रुपयांमध्ये मिळणार आहे आणि त्याशिवाय 1 हजार रुपयांपर्यंत इतर डिस्काऊंट आणि कॅशबॅक अशा धमाका ऑफर्सचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे.

हेही वाचा-Jioची भन्नाट ऑफर, 129 रुपयांत 2GB डेटासह मिळणार अनेक फायदे

हेही वाचा-चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 11:14 AM IST

ताज्या बातम्या