डोंबिवली, 26 एप्रिल : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कल्याण आणि डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आज 12 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासामध्ये 12 रुग्ण आढळून आले आहे. डोंबिवलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. डोंबिवलीत राहणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा - संजय राऊतांनी राज्यपालांना इशारा देण्यासाठी केले ट्वीट, पण...
कल्याण आणि डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 129 वर पोहोचली असून आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 86 जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7628 वर
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून एकूण संख्या 7628वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तब्बल 323 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये शनिवारी 811 नवीन कोरोना रुग्ण समोर आले.
राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे आकडे आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले असून यामध्ये शनिवारी म्हणजेच 25 एप्रिलला 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नवीन मृत्यू झालेल्यांपैकी मुंबई येथील 13, 4 पुणे महानगरपालिका इथे तर 1 मृत्यू मालेगाव इथे , 1 पुणे ग्रामीणमध्ये, 1 पिंपरी चिंचवडमध्ये, 1 धुळे इथे तर 1 मृत्यू सोलापूर शहरात झाल.
हेही वाचा - 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या संवादातील ठळक मुद्दे
दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1076 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या राज्यात 1,25,393 लोक होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहेत तर 8,124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत.
संपादन - सचिन साळवे