#MainBhiChowkidar वर भाजप नेत्याशी भिडली रेणुका शहाणे, बोलली असे काही...

#MainBhiChowkidar वर भाजप नेत्याशी भिडली रेणुका शहाणे, बोलली असे काही...

भाजप आयटी सेलद्वारे ‘मी ही चौकीदार’ (#MainBhiChowkidar) या हॅशटॅगचं कॅम्पेन सुरू करण्यात आलं. हे कॅम्पेन एवढं यशस्वी झालं की परदेशातही याच्या चर्चा झाल्या.

  • Share this:

मुंबई, १७ मार्च २०१९- लोकसभा निवडणूक २०१९ आता काही दिवसांवर आली आहे. अशात सगळीकडे फक्त निवडणुकांच्या चर्चा होताना दिसत आहे. राजकीय पक्ष तर पूर्ण तयारीत मैदानात उतरले आहेत. पण नुकतेच सोशल मीडियावर वेगळंच काही पाहायला मिळालं. भाजप आयटी सेलद्वारे ‘मी ही चौकीदार’ (#MainBhiChowkidar) या हॅशटॅगचं कॅम्पेन सुरू करण्यात आलं. हे कॅम्पेन एवढं यशस्वी झालं की परदेशातही याच्या चर्चा झाल्या. जगभरात #MainBhiChowkidar हा हॅशटॅग ट्रेण्ड होत होता. या कॅम्पेनमध्ये भाजपच्या सदस्यांनी सहभाग घेतला. सर्व सदस्यांनी ट्विटरवर या हॅशटॅगने पोस्टही केले. पण जेव्हा एम.जे. अकबर यांनी ट्वीट केलं तेव्हा खरी चर्चा रंगली.

भाजप नेते एमजे अकबर यांनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेत ट्वीट केले. त्यांनी लिहिले की, ‘मला #MainBhiChowkidar कॅम्पेनमध्ये सहभागी झाल्याचा गर्व आहे. एक नागरिक म्हणून मला माझ्या भारतावर प्रेम आहे. मी भ्रष्टाचार, अस्वच्छता, गरिबी आणि दहशतवादाला संपण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि नवीन भारत घडवण्यात सहकार्य करेन जो मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध असेल.’

हे ट्वीट बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पाहिलं तेव्हा त्यांना राग अनावर झाला. त्यांनी एमजे अकबर यांना ट्वीटवरच उत्तर देत लिहिले की, ‘जर तुम्हीही चौकीदार असाल तर कोणतीच महिला सुरक्षित नाही.’ रेणुका शहाणे यांनी या ट्वीटमध्ये #BesharmiKiHadd हा हॅशटॅग वापरत IndiaMeToo लाही टॅग केले.

#MeToo अभियानाअंतर्गत भारतात जे धक्कादायक खुलासे झाले त्यात पत्रकार आणि भाजप नेते एमजे अकबर यांचं नावंही सामिल होतं. अकबर यांच्यावर सुमारे २० महिला पत्रकारांचं यौन शोषण केल्याचा आरोप होता. यानंतर विरोधी पक्षाने अकबर यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली होती. परिणामी एमजे अकबर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्र्यंबकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ, VIDEO कॅमेऱ्यात कैद

First published: March 17, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading