'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय

'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय

आपल्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

  • Share this:

04 एप्रिल :  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’  किशोरी आमोणकर (वय 84) यांनी सोमवारी रात्री मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली.

किशोरीताईंचा जन्म 10 एप्रिल 1932 साली मुंबईत झाला. अगदी लहान वयापासूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका होत्या. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किशोरीताईंनी त्यांच्या आई शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतलं.

किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या किशोरी आमोणकर यांना ‘गानसरस्वती’ असं म्हटलं जातं.

किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसंच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे.

किशोरीताईंनी 1950च्या दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. किशोरीताईंनी 1964 साली ‘गीत गाया पत्थरोंने’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं. 1990 मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं.

देश-परदेशांतील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांनी अनेक वर्षे आपली कला सादर करून रसिकांना मोहवून टाकत. त्यांनी ‘स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. किशोरीताईंच्या सांगीतिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी पुण्यात गानसरस्वती महोत्सव आयोजित केला जातो.​

सूर संपदा

राग

मल्हार मालिका

म्हारो प्रणाम

घट घट में पंछी बोलता

प्रभात

समर्पण

संप्रदाय

बॉर्न टु सिंग

लाइव्ह इन लंडन

किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय :

किशोरीताईंचा जन्म 10 एप्रिल 1932 साली मुंबईत झाला.

भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले .

त्यानंतर त्यांनी अनेक घराण्याकडून गायनाचे धडे घेतले.

किशोरीताईंनी 1964 साली गित गाया पत्थरोनें या चित्रपटासाठी गाणं गायलं.

त्यानंतर त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या.

1990 मध्ये त्यांनी 'दृष्टी' या सिनेमासाठी पार्श्वगायन केलं.

किशोरीताईंनी संगीतक्षेत्रात अनेक शिष्य घडवले.

देशपरदेशातील अनेक मैफलींमध्ये गायन.

किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :

सहेला रे आ मिल जाए

अवघा रंग एक झाला

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

माझे माहेर पंढरी

हे श्यामसुंदर राजसा

अवचिता परिमळु

कानडा विठ्ठल

सुखसोयरा सुखाचा विसांवा

किशोरीताईंचे शिष्यगण :

माणिक भिडे

मिना जोशी

सुहासिनी मुळगावकर

अरुण द्रविड

रघुनंदन पनशीळकर

आरती अंकलिकर टिकेकर

देवकी पंडित

मीरा पनशिळकर

शिवाजी शितोळे

नंदिनी बेडेकर

तेजश्री आमोणकर

पुरस्कार :

संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985

पद्मभूषण पुरस्कार, 1987

संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 1997

संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, 2000

पद्मविभूषण पुरस्कार, 2002

संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2009

First published: April 4, 2017, 9:51 AM IST

ताज्या बातम्या