S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पुणे, ठाणे आणि नवी मुंबईचं नामांतर करा -अबू आझमी

पुण्याचे नाव जिजामाता नगर करावे आणि नवी मुंबईचे छत्रपती शिवाजीनगर करावे अशी मागणी केली

Updated On: Nov 28, 2018 11:41 PM IST

पुणे, ठाणे आणि नवी मुंबईचं नामांतर करा -अबू आझमीमुंबई, 28 नोव्हेंबर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पुणे, ठाणे आणि नवी मुंबईचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. पुण्याचं नाव जिजामाता नगर असं करावं अशी मागणी आझमींनी केली.उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने नामांतर करण्याचा धडका लावला आहे. त्याचीच री ओढत आझमी यांनी राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी पुणे शहराला जिजापूर असं नावं द्यावी अशी मागणी केली होती. संभाजी ब्रिगेडच्या मागणीवरुन मोठा गदारोळ झाला होता.


आता अबू आझमी यांनी नामांतराची नव्याने मागणी केली आहे. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे त्यामुळे पुण्याचे नाव जिजामाता नगर करावे आणि नवी मुंबईचे छत्रपती शिवाजीनगर करावे अशी मागणी केली आहे. तसंच सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्ह्या ठाण्याचे नाव संभाजीनगर करावे असं अबू आझमी म्हणाले आहे.


अबू आझमी यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.


===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 11:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close