शहीद पोलिसांची आठवण करताच पंतप्रधानांना आले गहिवरून!

शहीद पोलिसांची आठवण करताच पंतप्रधानांना आले गहिवरून!

पंतप्रधानांनी देशाची सेवा करताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाची आठवण केली. त्यावेळी त्यांचा गळा भरून आला.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.21 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवीवारी राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि संग्रालय देशाला सर्मित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशाची सेवा करताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाची आठवण केली. त्यावेळी त्यांचा गळा भरून आला. काही क्षण थांबून त्यांनी गहिवरलेल्या आवाजात पोलीस आणि एन.डी.आर.एफ.च्या जवानांचं कौतुक केलं.

पंतप्रधान म्हणाले, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचं देशासाठी मोठं योगदान आहे. त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच देशाचा गाडा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. मात्र ज्या प्रमाणात पोलिसांच्या त्यागाची दखल घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात ती घेतली गेली नाही. पोलीस स्मारक राष्ट्राला समर्पण करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे, असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, हे स्मारक होण्यासाठी 60 वर्ष का लागलेत याचा विचार केला पाहिजे. अशाच प्रकारची चांगली कामं करण्यासाठीच देवानं माझी निवड केलेली आहे असं मला वाटतं. आपत्ती निवारणात नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.

दिल्लीतल्या चाणक्यपूरी भागात 6.12 एकरवर हे स्मारक तयार करण्यात आलंय. यात एक 30 फुटांची काळ्या ग्रानाईटपासून बनवलेली 238 मूर्ती आहे. पोलिसांच्या शौर्याची माहिती देणारं संग्रहालय असून त्या संग्रहालयात शहीद झालेल्या 34 हजार 800 शहीद पोलिसांची नावं कोरण्यात आलेली आहे. 1959 मध्ये लद्दाखच्या हॉट स्प्रिंग इथं 10 पोलीस शहीद झाले होते. तेव्हापासून तो दिवस राष्ट्रीय शहीद पोलीस दिवस म्हणून ओळखला जातो.

 

 

First published: October 21, 2018, 8:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading