सांगली, 3 एप्रिल: सांगलीकरांना दिलासा देणारे वृत्त आहे. जिल्ह्यातील 24 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजच्या त्या तिघांचा समावेश तर 25 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी दिली आहे. त्यामुळे सांगलीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 24 जणांचे नमुने गेल्या दोन दिवसांत स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. यामधील 24 जणांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. या 24 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा...लॉकडाउन आणखी वाढणार? एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयामुळे शंका
सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता परदेशवारी करुन आलेल्यांची संख्या 1459 आहे. त्यापैकी 885 होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या 46 आहे. त्यात मिरजमध्ये 19 तर इस्लामपूरमध्ये 27 जणांचा समावेश आहे. आयसोलेशन कक्षात 25 जणांना दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर आतापर्यंत 415 लोकांचे 14 दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील 113 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात 88 जण निगेटिव्ह तर 25 जण पोझिटिव्ह आढळून आले आहेत.
हेही वाचा..किराणा-भाजी घेऊन घरी आल्यावर काय-काय करायचं? हीना खानची शिकवणी तुफान हिट
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490
दुसरीकडे, कोरोनाव्हायरसचे महाराष्ट्रात आज दिवसअखेर 490 रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे.
दिवसभरात मुंबईत 43 कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात आज 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे.
हेही वाचा..संचारबंदीत भाजपच्या माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर काठ्यांचा प्रसाद
राज्यात एकूण 490 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत.
मुंबई – 278
पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 70
मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 54
सांगली – 25
नागपूर – 16
अहमदनगर – 20
बुलढाणा- 5
यवतमाळ – 4
सातारा – 3
औरंगाबाद – 3
कोल्हापूर – 2
रत्नागिरी – 2
वाशिम-1
सिंधुदुर्ग – 1
गोंदिया – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
उस्मानाबाद -1