Jio News : एकाच ठिकाणी सर्व बातम्या मिळवण्यासाठी नवं अ‍ॅप

Jio News : एकाच ठिकाणी सर्व बातम्या मिळवण्यासाठी नवं अ‍ॅप

जिओनं मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तसंच वेब-आधारित सेवा नव्या स्वरूपात आणली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : राज्यासह जगाशी कनेक्ट राहणं आता आणखी सोपं झालं आहे. कारण, जिओनं मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तसंच वेब-आधारित सेवा (www.jionews.com) नव्या स्वरूपात तुमच्या भेटीला आली आहे. त्यामुळे प्रत्येक बातमीची अपटेड मिळणं आता आणखी सोपं झालं आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2019, आयपीएल 2019, क्रिकेट वर्ल्डकप 2019 प्रत्येक बातमी आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. ब्रेकिंग न्यूज, लाइव्ह टीव्ही, व्हिडिओ, मासिके, वृत्तपत्रे आणि बऱ्याच गोष्टीं या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

12 पेक्षा अधिक भारतीय भाषा

12 पेक्षा जास्त भारतीय भाषांमधून वाचकांना सर्व गोष्टींची अपडेट मिळणार आहे. 150 पेक्षा जास्त लाइव्ह चॅनेल, 800 पेक्षा अधिक मासिके, 250 पेक्षा जास्त वृत्तपत्रे, प्रसिद्ध ब्लॉग आणि भारत आणि जगभरातील बातम्यांच्या वेबसाइट्स या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय, तंत्रज्ञान, फॅशन, करिअर, आरोग्य, ज्योतिषशास्त्र, आर्थिक अशा एका ना अनेक प्रकारच्या अपडेट्स युजर्सना उपलब्ध होणार आहेत.

150 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स

150 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलसह युजर्स बातम्यांचा आनंद घेऊ शकतात. ज्यामध्ये देशभरातील सर्व अग्रगण्य आणि लोकप्रिय टीव्ही चॅनेल समाविष्ट असणार आहेत. बॉलीवूड, फॅशन, हेल्थ, ऑटोमोटिव्ह, तंत्रज्ञान, क्रीडा या सर्व क्षेत्रातील अपटेड तुम्हाला मिळणार आहेत. शिवाय, 800 पेक्षा अधिक मासिके देखील उपलब्ध आहेत.

त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहण्यासाठी जिओ न्यूज हा पर्याय उत्तम ठरणार आहे. वाचकांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये तुमच्या मातृभाषेचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात चाललेली बातमी केवळ एका क्लिकवर आता उपलब्ध होणार आहे.

पुणे-सातारा महामार्गावर कारला भीषण आग पाहा LIVE VIDEO

First published: May 7, 2019, 4:22 PM IST
Tags: JIO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading