रिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर

रिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर

रिलायन्स इंडस्ट्रीजने 2019 च्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत.

  • Share this:

मुंबई,ता.27 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीजने 2019 च्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. या तीन महिन्यात कंपनीचा एकूण नफा 4.5 टक्क्यांनी वाढून 9,485 कोटींवर गेला आहे. मागच्यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यातला एकूण नफा 9,079 कोटी एवढा होता. कंपनीचं एकूण उत्पन्न 42.2 टक्क्यांनी वाढून ते 1.29 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 2018 मध्ये पहिल्या तिमाहीतली एकूण उलाढाल 90,537 रूपये एवढी होती.

असे आहेत आकडे

आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकूण EBITDA (Earnings Before Interest, Taxes, Depreciation and Amortization) 18,469 कोटी रूपयांवरून वाढून तो 20,661 कोटी रूपये झाला आहे.

आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकूण EBITDA मार्जिन 15.8 टक्क्यांवरून 16 टक्क्यांवर गेला आहे.

पहिल्या तिमाहीत पेट्रोकेमिकल विभागाचं एकूण उत्पन्न 38,113 कोटी रूपयांवरून 40,287 कोटी रूपयांवर गेलंय. पहिल्या तिमाहितलं पेट्रोकेमिकल विभागाचं EBIT 6,435 कोटींवरून 7,857 कोटींवर गेलं आहे.

पहिल्या तिमाहित तेल शुद्धिकरणातून होणारं उत्पन्न 93,519 कोटींवरून 95,646 कोटींवर गेलं आहे. तेल शुद्धिकरणाचं EBIT 5,607 कोटी रूपयांवरून घटून 5,315 कोटींवर आलं आहे.

पहिल्या तिमाहित रिटेल मधून येणारं उत्पन्न 24,183 कोटीरूपयांवरून 25,890 कोटींवर गेलं आहे. तर रिटेल EBIT 951 कोटींवरून 1,069 कोटी रूपयांवर गेलं आहे.

डिस्क्लेमर: 'न्यूज18 लोकमत' रिलायंस इंडस्ट्रीज ची कंपनी नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड चा भाग आहे. नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. ​

First published: July 27, 2018, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading