News18 Lokmat

रिलायन्सने विकत घेतले हॅथवे आणि डेन, अजून स्वस्त होणार इंटरनेट सर्विस

यामुळे रिलायन्स जिओला त्यांचे ब्रॉडबँड नेटवर्क मोठ्या प्रमाणात सुरू करायला मदत होईल

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 12:12 PM IST

रिलायन्सने विकत घेतले हॅथवे आणि डेन, अजून स्वस्त होणार इंटरनेट सर्विस

मुंबई, १८ ऑक्टोबर २०१८- रिलायन्स इंडस्ट्रीने केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड सर्विस देणाऱ्या हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क्समध्ये मोठी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने हॅथवे केबलमध्ये ५१.३ टक्के भागीदारी घेतली आहे. यासाठी त्यांनी २९४० कोटींची गुंतवणूक केली आहे. डेन नेटवर्क्समध्ये रिलायन्सने ६६ टक्क्यांची भागीदारी घेत २०४५ कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे रिलायन्स जिओला त्यांचे ब्रॉडबँड नेटवर्क मोठ्या प्रमाणात सुरू करायला मदत होईल. हॅथवे ग्रुपवर रहेजा ग्रुपचे अधिकार आहेत. तर डेनमध्ये समीर मनचंदा यांची मोठी भागिदारी आहे.

आता काय होईल- हॅथवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओला प्रेफेंशियल इश्यू देण्यावर मंजूरी दिली आहे. हॅथवे कंपनी जिओला ९०.८ कोटी शेअर ३२.३५ रुपयांच्या भावाने देणार आहे. दुसरीकडे डेन नेटवर्क्सने जिओला २८.१ कोटी शेअर ७२.६६ रुपयांच्या भावाने दिले.

Loading...

ग्राहकांना काय फायदा होईल- एडलवाइस सिक्युरिटीचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट अबनीश रॉय यांनी म्हटले की, या करारामुळे दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहे. या करारातून रिलायन्स जिओ लोकल केबल नेटवर्कमध्ये स्वतःचा जम बसवू शकेल. तसेच कंपनीलाही या सर्व गोष्टींचा आर्थिक फायदा होईल. यामुळे ग्राहकांना स्वस्त इंटरनेट मिळेल.

VIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवन होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...