रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, अनंत अंबानी मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश

रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, अनंत अंबानी मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी, राजकारणी, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजनंही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीला रिलायन्स इंडस्ट्रीजनंही हात पुढे केला आहे. रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता 5 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा धनादेश दिला आहे. गेल्या 2 आठवड्यांआधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात आपला संसार गमावून बसलेल्या नागरिकांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.

तब्बल 8 दिवस संपूर्ण गावं पुराच्या पाण्याखाली होती. या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. संपूर्ण गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. आयुष्यभराचा संसार या पुरामध्ये वाहून गेला. त्यांना या संकटातून उभं करण्यासाठी देशभरातून मदतीचा हात येत आहे. त्यात आता रिलायन्स इंडस्ट्रीजनंही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

इतर बातम्या - मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी, राजकारणी, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. दिग्गजांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार आव्हान करण्यात येत आहे. वसईतल्या काही सामाजिक संस्थांनी मिळून सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील वाळवा, हसुर आणि शिरोळ या गावातल्या कुटुंबियांपर्य़त मदत पोहोचवली. वसई फर्स्ट, जागरूक नागरिक संस्था, लायन्स क्लब ऑफ वसई, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, वसई दैवज्ञ समाज, विश्वजित मित्रमंडळ, स्टेप अप फाऊंडेशन, अशा अनेक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.

इतर बातम्या - एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'

अनोखी ईद, नमाज पठण होताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लीम बांधव सरसावले

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला. बकरी ईदनिमित्त नमाज पठत केल्यानंतर मुस्लीम समाजाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा केली होती. दौंडमध्ये ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली होती. यावेळी पूरग्रस्तांसाठी मौलाना मोहम्मद रेहमतुल्ला यांनी नमाज पठण केल्याचंही पाहायला मिळालं. कोल्हापुरात पूर आल्यानंतर महाराष्ट्रात माणुसकीचा महापूर पाहायला मिळाला. समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले. कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने यंदाच्या बकरी ईदला आर्थिक कुर्बानी करण्याचा निश्चय केला होता.

VIDEO: 'मोदी हिटलर, 56 इंचाची छाती असणारे राज ठाकरेंना घाबरले'; मनसेचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या