S M L

'या' दिवशी होतात सर्वात जास्त ब्रेकअप; रिसर्चमध्ये आलं समोर

प्रेमात पडल्यानंतर दुरावा निर्माण करण्यासाठी फक्त एक कारण पुरेसं असतं.

Updated On: May 3, 2019 08:06 PM IST

'या' दिवशी होतात सर्वात जास्त ब्रेकअप; रिसर्चमध्ये आलं समोर

मुंबई, 3 मे : प्रेमात पडल्यानंतर दुरावा निर्माण करण्यासाठी फक्त एक कारण पुरेसं असतं. आणि तेच करण त्यांना ब्रेकअपपर्यंत नेऊन पोहोचवतं. अशावेळेस सर्वात जास्त भीती असते ती जवळच्या व्यक्तीचा विश्वास गमावण्याची. प्रेमाच्या नात्यात निर्माण होणारी ही दरी म्हणजेच 'ब्रेकअप' संदर्भात नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.

illicit encounters नावाच्या वेबसाइटने जवळपास 1 हजार लोकांवर हा सर्व्हे केला. ज्यात सर्वात जास्त नात्यांचं ब्रेकअप हे शुक्रवारी होतं ही बाब प्रकर्षाने समोर आली. प्रेमात आकंठ बुडालेल्यांची याच दिवशी जास्त फसवणूक होते, असा निष्कर्ष हे सर्वेक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या 'वुमेन हेल्थ' या संस्थेनं काढला.

यासंदर्भात संस्थेने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, कुणी आपल्याशी खोटं बोलत आहे अशी जाणीव जर तुम्हाला शुक्रवारी झाली, तर ती व्यक्ती हमखास तुमची फसवणूक करू शकते. जवळपास 75 टक्के लोक या दिवशी जवळच्या वक्तीसोबत खोटं बोलतात, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.


''प्रेमात फसवणूक करणं ही लोकांची मानसिकता बनली आहे. जी लोकं नियमांचं काटोकोर पालन करतात, तीच लोकं जवळच्या व्यक्तीची फसवणूक करतात'', असं illict encounters चे प्रवक्ते क्रिस्टन ग्रांट सांगतात. ''अशी लोकं आठवड्यातून दोनदा त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटतात. त्यातले 65 टक्के लोकं हे मंगळवारी त्यांच्या जवळच्या व्यक्तीसोबत राहणं पसंत करतात. आणि जोपर्यंत ते पकडले जात नाहीत तोपर्यंत ते जवळच्या व्यक्तीची खोटं बोलून फसवणूक करतात. आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली जवळची व्यक्ती त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवते'', असं क्रिस्टन ग्रांट सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2019 08:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close