मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चार-चौघांंमध्ये वावरताना या सवयी बऱ्या नव्हेत; तुम्हीही या चुका करत नाहीत ना?

चार-चौघांंमध्ये वावरताना या सवयी बऱ्या नव्हेत; तुम्हीही या चुका करत नाहीत ना?

अशा लोकांना स्वतःकडेच एकदा पाहण्याचीही गरज असते (Self Analysis). खरंतर आपण सर्वांनी आपण नेमकं कसं वागतोय याचा विचार केला पाहिजे. आपल्यामध्ये अशा काही सवयी आहेत का? ज्यामुळे इतरांना त्रास होतो हे ओळखले पाहिजे.

अशा लोकांना स्वतःकडेच एकदा पाहण्याचीही गरज असते (Self Analysis). खरंतर आपण सर्वांनी आपण नेमकं कसं वागतोय याचा विचार केला पाहिजे. आपल्यामध्ये अशा काही सवयी आहेत का? ज्यामुळे इतरांना त्रास होतो हे ओळखले पाहिजे.

अशा लोकांना स्वतःकडेच एकदा पाहण्याचीही गरज असते (Self Analysis). खरंतर आपण सर्वांनी आपण नेमकं कसं वागतोय याचा विचार केला पाहिजे. आपल्यामध्ये अशा काही सवयी आहेत का? ज्यामुळे इतरांना त्रास होतो हे ओळखले पाहिजे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : काहीजण त्यांच्या कुटुंबातील लोकांवर, मित्र, सहकारी किंवा कोणत्याही अज्ञात व्यक्तींवर सतत टीका करत राहतात. काहीतरी चुका काढत राहणे त्यांना जणू आवडते की, काय असे वाटते. हे लोक इतरांच्या कोणत्याही वागण्यावर नाखूष असतात आणि स्वतःच्या त्रासांसाठी इतरांना दोष देतात. ते इतरांच्या चुका किंवा त्यांनी केलेली कामे सर्वांच्या समोर शेअर करण्यात अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. पण, अशा लोकांना स्वतःकडेच एकदा पाहण्याचीही गरज असते (Self Analysis). खरंतर आपण सर्वांनी आपण नेमकं कसं वागतोय याचा विचार केला पाहिजे. आपल्यामध्ये अशा काही सवयी आहेत का? ज्यामुळे इतरांना त्रास होतो हे ओळखले पाहिजे. आपण अशा काही लोकांच्या सवयींबद्दल माहिती घेऊ, (Relationahip Tips, Trouble Making Habits) ज्यामुळे इतर लोकांना त्रास होऊ शकतो. 1. सर्व श्रेय स्वतः घेणे घरात, शेजारी, मित्रांमध्ये, कार्यालयातील सहकारी, सर्वत्र तुम्हाला असे लोक सापडतील जे आपली वाहवा करून घेण्यासाठी इतरांचे श्रेय लुटण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला ही सवय असेल की, तुम्ही इतरांच्या कामाचे श्रेय मोठ्यांसमोर किंवा बॉससमोर तुमचा ठसा उमटवण्यासाठी घेता. तर कृपया ही सवय आजच बदला. या सवयीमुळे, लोक काही दिवसातच तुमच्यापासून पळून जातील आणि तुमच्याबरोबर काम करण्यास टाळाटाळ करू लागतील. एवढेच नाही तर बॉसच्या नजरेत तुमची छाप कमी होईल. 2. वैचारिक मतभेदांवर भांडणे प्रत्येकाची विचारसरणी आणि विचार सारखे  नसतात, पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही लोकांवर टीका करत रहा किंवा वैचारिक मतभेदांवर भांडत राहा. असे असू शकते की कामावर किंवा घरी, दोन सहकारी किंवा सदस्यांचे राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक किंवा वैयक्तिक मुद्द्यांवर भिन्न मत असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वत्र तुमचे घोडे दामटत राहाल. तुम्हाला ही सवय असेल तर तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे वाचा - तरुणाला ओलीस ठेवून काकीनं पाजलं स्वतःच Urine, मारहाण करत काकानं शूट केला Video 3. जात आणि धर्मावर कठोर टिप्पणी करणे एखाद्याच्या वैयक्तिक, जात, धार्मिक, सामाजिक परंपरांवर भाष्य करणे सभ्य माणसाचे लक्षण नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही प्रत्येकाचे आडनाव, त्यांची जात किंवा प्रदेश इत्यादीवर जबरदस्तीने प्रश्न केला तर ती तुमची चुकीची सवय आहे. असे केल्याने लोक तुम्हाला टाळतील आणि तुमचा आदर करणार नाहीत. हे वाचा - झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून झाडल्या गोळ्या; धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं! 4. वैयक्तिक बाबींमध्ये रस घेणे जर तुम्ही लोकांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये जास्त नाक खुपसत असाल. त्याविषयी तुम्ही खोदून पुन्हा पुन्हा विचारत  असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. असे केल्याने इतर लोकांशी तुमच्या वैयक्तिक संबंधांवर वाईट परिणाम होतील. 5. फुक्कटचा सल्ला देणं कोणी न विचारताच जर तुम्ही प्रत्येकाला उगीचच सल्ला देत असाल, तर तुमच्या या सवयीमुळे लोक अस्वस्थ होऊ शकतात. अशा परिस्थितीत पुढच्याने काही विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Relation, Relationship, Relationship tips

पुढील बातम्या