मुंबई, २४ जानेवारी २०१९- बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रेखा या व्हिडिओमध्ये फारच मादक दिसत आहेत. मात्र अमिताभ बच्चन यांच्या फोटोकडे पाहून त्यांनी अशी काही रिअॅक्शन दिली की तिथे उपस्थित साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं.
रेखा यांचा हा व्हिडिओ प्रत्येकजण किमान दोन ते तीनवेळा पाहत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळी बॉलिवूडमधील इतर कलाकार मंडळीही उपस्थित होत्या. रेखा यांचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे.
रेखा या व्हिडिओमध्ये डब्बू रत्नानी आणि त्याच्या मुलांसोबत फोटोशूट करताना दिसत आहेत. तर तिकडे उपस्थित फोटोग्राफर त्यांना वेगवेगळ्या पोझ द्यायची विनंती करत आहेत. रेखाही त्यांच्या विनंतीला मान देत वेगवेगळ्या पोझ देताना दिसतात.
यानंतर फोटोग्राफर त्यांना एकट्याने पोझ द्यायला सांगतात. एकट्याने पोझ देण्यासाठी रेखा थोड्या दूर जातात आणि एका चांगल्या फोटोसोबत पोझ देण्यासाठी मागे वळतात, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांचा फोटो दिसतो. त्यांच्या फोटोला जबरदस्त रिअक्शन देत रेखा तिकडून निघतात.
रेखा यांना अनेकदा सिनेमांशी निगडीत कार्यक्रमांमध्ये पाहिले जाते. रत्नानीचं कॅलेंडर लॉन्च हा बॉलिवूडकरांसाठी एक मोठा सोहळा असतो. यावेळी रेखा यांना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वेगळ्या अंदाजात पाहण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा