लखनऊ, 19 मे : पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकाऱ्याची चर्चा मागील काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील रिना द्विवेदी सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान चर्चेत आल्या होत्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. रिना यांनी उत्तर प्रदेशातील देवरियामधील मतदार संघातून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत सेल्फी देखील घेतला. लखनऊमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी मतदानाकरता आपल्या सासरी देवरिया इथं दाखल झाल्या. यावेळी त्यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं.
PHOTOS: पिवळ्या साडीतील त्या महिला अधिकाऱ्याची अशी आहे Lifestyle
कोण आहे रिना द्विवेदी
रिना द्विवेदी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो. सुदंर दिसणाऱ्या रिना यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. रिना या सलमान खानच्या खूप मोठ्या फॅन आहेत.
मुलाला व्हायचंय IAS
रिना यांच्या पतीनं निधन 2013मध्ये झालं. पतीच्या निधनानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळाली. त्यांचा मुलगा दहावीमध्ये असून त्याला IAS व्हायचं आहे. तो सध्या लखनऊमध्ये शिक्षण घेत आहे.
VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा