टेबलावर ठेवला होता Xiaomi चा फोन, लागली अचानक आग!

टेबलावर ठेवला होता Xiaomi चा फोन, लागली अचानक आग!

मुंबईतील एका ग्राहकाने आपला Xiaomi चा Redmi फोन फुटला असल्याची तक्रार केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : शिओमी (Xiaomi) चा रेडमी (Redmi) हा फोन भारतात सर्वात जास्त विकला जातो. चांगल्या फिचर्ससह या फोनची बॅटरीही दर्जेदार समजली जाते. परंतु, मुंबईतील एका ग्राहकाने आपला Xiaomi चा Redmi फोन फुटला असल्याची तक्रार केली आहे.

मुंबईत राहणाऱ्या ईश्वर चव्हाण यांनी आरोप केला आहे की, फोनच्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टमुळे  Redmi Note 7S या फोनला अचानक आग लागली. त्यांनी आपल्या फोनचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहे. यामध्ये फोनचा पाठीमागचा भाग जळून खाक झाला आहे.

ईश्वर चव्हाण यांनी मागिल महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी केला होता. परंतु, एकेदिवशी  फोन टेबलवर ठेवला आणि ऑफिसच्या कामात व्यस्त होते. तेव्हा त्यांनी काही जळण्याचा वास आला. तेव्हा त्यांची नजर फोनवर पडली असता त्यातून धूर निघत होता.

ईश्वर चव्हाण यांनी दावा केला आहे की, या फोनला जेव्हा आग लागली तेव्हा तो चार्जिंगला सुद्धा लावलेला नव्हता. तसंच तो कुठे पडलाही नव्हता. हा फोन मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टमुळे जळाला, असा आरोप त्यांनी केला. तसंच जेव्हा फोनबद्दल तक्रार केली असता योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

परंतु, शाओमीने या संपूर्ण प्रकरणात ईश्वर चव्हाण यांचीच चूक असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या गॅजेट्स नाऊकडे शाओमी कंपनीने खुलासा केला आहे. यात कंपनी म्हणते की, 'आम्ही आमच्या प्रत्येक उत्पादनाची संपूर्णपणे चाचणी करूनच विक्रीसाठी उपलब्ध करत असतो. या प्रकरणाची आम्ही चौकशी केली, यात ईश्वर यांचीच चुकी आहे.'

Published by: sachin Salve
First published: November 23, 2019, 8:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading