आंध्र प्रदेश, 02 सप्टेंबर : मोबाइल बॅटरी फुटल्याची, बॅटरीचा स्फोट झाल्याच्या बर्याच बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. अशीच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. प्रसिद्ध ब्रँड शाओमी (xiaomi) चा फोन एका माणसाच्या पॅन्टमध्ये फुटला. Fossbytes च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशच्या इथल्या एका शाओमी युजरच्या पॅन्टमध्ये ठेवलेला फोन गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय मधू बाबू हे सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. ते बाईक चालू करताच त्यांच्या लक्षात आलं की फोन गरम झाला आहे. त्यांनी खिशातून फोन बाहेर काढण्याच्या आतच त्याचा स्फोट झाला. खिशातून धूर बाहेर निघाल्य़ानंतर मात्र रस्त्यावरील इतर प्रवासीदेखील घाबरले.
मधू यांनी घाबरुन ताबडतोब फोन खिश्यातून बाहेर काढला आणि रस्त्यावर फेकला. ते फोन फुटल्यामुळे अगदी लाल झाला होता. या संपूर्ण अपघातात मधु यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. मधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनने खिशात असा काही पेटला घेतला जसं रॉकेल पेटवल्यावर होतं. यामध्ये फोनचं कव्हरदेखील पूर्णपणे जळालं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जर फोनला कव्हर नसतं तर मधू यांनी आणखी दुखापत झाली असती.
इतर बातम्या - बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाने लावली प्रियकराची वाट!
मधू यांनी एप्रिल 2019 मध्ये नवीन 'Redmi 6A' खरेदी केला होता. हा फोन पहिल्या 4-5 महिन्यांपर्यंत चांगला चालू राहिला, परंतु त्यानंतर तो हँग होऊ लागला. तर फोनचा स्फोट होण्याच्या 2 तास आधी त्याला चार्ज करण्यात आलं होतं असं मधू यांनी सांगितलं. शाओमी कंपनीला या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली असून फोन फुटण्यामागे काय कारण आहे याचा आता कंपनी तपास करत आहे. दरम्यान, अशा घटनांना आम्ही गांभीर्याने घेत असून याचा तपास घेत असल्याचं शाओमी कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. तर मधू यांच्याशी शाओमीनं संपर्क केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.
VIDEO: आतापर्यंत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्या टॉप 18
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.