Elec-widget

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ,पिकविम्यातून होणार कर्जाची वसुली

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ,पिकविम्यातून होणार कर्जाची वसुली

बँकांना कर्जाचा हप्ता थकविलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यापैकी ५० टक्के रक्कम कापून घेता येणार

  • Share this:

30 मार्च : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अगोदरच अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारविरोधातील वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना दिलेला आदेश यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

या आदेशात राज्य सरकारने जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून त्यांची कर्जाची रक्कम वसुल केली जावी, असं म्हटलं आहे. त्यामुळे बँकांना कर्जाचा हप्ता थकविलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यापैकी ५० टक्के रक्कम कापून घेता येणार आहे.

गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने पीक चांगले झाले होते. त्यामुळे यंदा पीक विम्यातून कर्जाची वसूली करावी, असं राज्य सरकारने म्हटलंय. राज्य सरकारच्या या आदेशामुळे विरोधक आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासूनच विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून विरोधकांनी अर्थसंकल्प सादर केला जात असतानाही प्रचंड गोंधळ घालून सभागृह डोक्यावर घेतलं होतं. याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबनही करण्यात आले होते. त्यामुळे विरोधक सरकारविरोधात आणखीनच आक्रमक झाले होते.

मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शेतकऱ्यांची कर्जे माफ करून काही साध्य होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्याऐवजी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...