पुणेकराने रचला रेकॉर्ड; कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी 7 महिन्यात 9 वेळा प्लाझ्मा दान

पुणेकराने रचला रेकॉर्ड; कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी 7 महिन्यात 9 वेळा प्लाझ्मा दान

आत्तापर्यंत देशात एखाद्या दात्याने इतक्या वेळा प्लाझ्मा दान करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

  • Share this:

पुणे, 20 फेब्रुवारी : आत्तापर्यंत देशात एखाद्या दात्याने इतक्या वेळा प्लाझ्मा दान करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. B positive रक्तगट असलेल्या मुनोत यांची ही be positive स्टोरी वाचून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. अजय मुनोत यांना जुलै महिन्यात कोरोना झाला आणि नंतर antibodies तयार झाल्यानं त्यांनी सह्याद्री रुग्णालयात प्लाझ्मा दान केलं. तेव्हापासून त्यांनी प्लाझ्मा दानाची सुरुवात केली ती आतापर्यंत सुरू आहे. त्यांच्या antibodies मुळे इतर रुग्णांना जीवदान मिळतंय यामुळं ते हरखून गेले आणि रुग्णालय ही त्यांना आवश्यकता असेल तसं बोलावू लागली.

6 वेळा प्लाझ्मा दान झाल्यावर एका नेटकऱ्याने फेसबुकवर रेकॉर्ड करताय का असे विचारलं आणि खरंच हे रेकॉर्ड होऊ शकतं असा विचार त्यांच्या मनात आला. एकदा प्लाझ्मा दान केल्यावर 14 दिवसांनंतरही व्यक्ती प्लाझ्मा देऊ शकतो आणि शरीरात anti बॉडीज असे पर्यंत कितीही वेळा देऊ शकतो. मुनोत यांना हे वरदानच लाभलं असं सह्याद्री रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर पूर्णिमा राव म्हणाल्या. पुण्यातील अजय मुनोत यांनी गेल्या 7 महिन्यात 9 व्या वेळी प्लाझ्मा दान केलं आहे.

हे ही वाचा-तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं

सुरुवातीला कोरोना झाल्यावर मुनोत यांची चलबिचल झाली होती. 2,3 वेळा प्लाझ्मा दान केल्यावर  कुटुंबीयही थोडे वैतागले होते. मात्र त्यांचा उत्साह, हेतू, इच्छाशक्ती यापुढं सगळं फिकं ठरलं. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांचा जीव वाचवणे हाच आपला उद्देश आहे आणि तोच संदेश आहे असं मुनोत म्हणतात. B positive रक्तगट असणाऱ्या अजय मुनोत यांची be positive स्टोरी सर्वानाच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

Published by: Akshay Shitole
First published: February 20, 2021, 8:31 PM IST
Tags: coronapune

ताज्या बातम्या