#DrRx ही आहेत गर्भपाताची कारणं, अशी ओळखा लक्षणं

#DrRx ही आहेत गर्भपाताची कारणं, अशी ओळखा लक्षणं

गर्भधारणेनंतर पहिल्या वीस आठवड्यांत आपोआप गर्भाची वाढ थांबून गर्भ शरीराबाहेर टाकायच्या प्रक्रियेला सुरुवात होते.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : जसलोक हॉस्पिटलमधील रिसर्च सेंटरच्या हाय रिस्क अबॉर्शन आणि भ्रूण औषध विशेषज्ञ डॉ. शिल्पा अग्रवाल यांनी गर्भपाताची काही प्रमुख कारणं सांगितली आहेत. अनेकदा गर्भपात वेळीच टाळता येतो का असा प्रश्न विचारला जातो. याबद्दल बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाल्या की, गर्भावस्थेच्या २० आठवड्यांपूर्वी गर्भपात होतो, रुग्णाची शेवटची मासिक पाळी कधी आली आहे त्यानुसार त्यानंतरचा काळ मोजला जातो. ५०० ग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या गर्भाचा आपोआप गर्भपात होतो. लवकरात लवकर गर्भपात हा मासिक पाळीच्या १२ आठवड्यांपूर्वी होतो. तर उशीराचा गर्भपात १२ ते २० आठवड्यांमध्ये होते.

वैद्यकीयदृष्ट्या गर्भधारणेच्या १० ते २० टक्के पहिल्या तिमाहीत साधारणपणे ८० टक्के गर्भपात होतात. तर एक टक्के जोडप्यांमध्ये पहिल्या बाळासाठी प्रयत्न करताना गर्भपात होतो. गर्भधारणेनंतर पहिल्या वीस आठवड्यांत आपोआप गर्भाची वाढ थांबून गर्भ शरीराबाहेर टाकायच्या प्रक्रियेला सुरुवात होते, याला नैसर्गिक गर्भपात असे म्हणतात. गर्भधारणेच्या वेळी मातेचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल, मातेला मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचा आजार असल्यास तिला नैसर्गिक गर्भपाताचा धोका सर्वात जास्त असतो.

नैसर्गिक गर्भपाताची कारणे

गर्भधारणेच्या वेळी स्त्रीबीज फलित झाल्यानंतर अत्यंत गुंतागुंतीच्या पद्धतीने गुणसूत्रांची रचना होते. यात थोडासा दोष निर्माण झाला तर व्यंग असलेले बालक जन्माला येते. शरीरातील हृदय, मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नियंत्रित करणाऱ्या गुणसूत्रांतील रचनेच्या दोषामुळे गर्भपात संभवतो.

पालकांचे त्यातही विशेषत: आईचं वय ३५ पेक्षा जास्त असल्यास आणि कोणाच्यागी गुणसूत्रांमध्ये काही दोष असल्यास नैसर्गिकरीत्या गर्भपात होऊ शकतो.

गर्भधारणा झाल्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यात मातेच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन जर योग्य पातळीत असेल तर गर्भ वाढू शकत नाही व गर्भपात होतो.

हे ही वाचा Kidney stone मुतखड्याचा त्रास असेल तर 'हे' 6 पदार्थ खाणं आजच कमी करा

गर्भाच्या पेशींमध्ये आई व वडिलांकडून आलेली प्रथिने असतात. जर या प्रथिनांविरुद्ध मातेच्या शरीरात काही प्रक्रिया झाल्या तर मातेचे शरीर हा गर्भ स्वीकारत नाही.

रुबेला, हर्पिस, टॉकझोप्लाझमोसिस, सायटोमेगॅलो व्हायरस अशा प्रकारचे जंतुसंसर्ग जर गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत मातेला झाल्यास गर्भपात होतो.

मातेच्या आरोग्यासाठी कधी कधी औषधं द्यावी लागतात. सर्वच औषधे गर्भासाठी सुरक्षित असतात असं नाही. काहींचा रासायनिक परिणाम गर्भावर होतो. म्हणूनच कोणतीही औषधं मनाने घेऊ नये. प्रत्येक औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

हे वाचा - तुमचं पोट साफ होत नाही का? हे उपाय एकदा करून पाहा

कधी कधी मातेच्या गर्भाशयात पडदा असतो किंवा फायब्रॉइड्स असतात. जन्मत:च जर गर्भाशयाच्या रचनेत दोष असेल तर गर्भ बहुतेक वेळा पहिल्या तीन महिन्यांपर्यंत वाढतो; पण नंतरच्या तीन महिन्यांत गर्भपोकळीतील दोषामुळे वाढू शकत नाही व गर्भपात होऊ शकतो.

तसंच क्षयरोग, क्लॅमिडीया यांसारख्या आजारामुळेही आणि धूम्रपान, अल्कोहोल यांच्या अती सेवनामुळेही गर्भपात होतो.

गर्भपाताची सर्वसाधारण लक्षणं

ओटीपोटात दुखणं.

पाठीत दुखणं.

थोडा/जास्त रक्तस्राव होणं.

काळसर रंगाचा रक्तस्राव होणं.

पांढऱ्या  रंगाचे काही तुकडे लाल रंगाच्या रक्तस्रावाबरोबर जाणं.

Special Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का?

First published: January 10, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading