Realmeच्या 'या' 5 स्मार्टफोन्समध्ये आले अपडेट्स; बदलली 'ही' फीचर्स

Realmeच्या 'या' 5 स्मार्टफोन्समध्ये आले अपडेट्स; बदलली 'ही' फीचर्स

Realme ने गेल्या वर्षातच लाँच केले होतो 'हे' स्मार्टफोन्स

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : Realme या स्मार्टफोन कंपनीने ने आपल्या Realme 2 Pro, Realme U1 यांसह आणखी 3 फोनमध्ये Android 9 Pie च्या बीटा व्हर्जनचे अपडेट्स जारी केले आहेत. हे अपडेट्स पुढल्या आठवड्यात रोलआउट केले जातील. ज्या फोनमध्ये हे अपडेट्स आले आहेत ते स्मार्टफोन गेल्यावर्षीच 'रियलमी'ने लाँच केले होते. पाचही स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे बदल केले जाणार असून त्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे.

Realme 2 Pro हा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात Android 9 Pie चं बीटा व्हर्जन आणि ColorOS 6.0 अपडेट्स रोलआउट होणार आहेत, असं एका युजने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देनाना Realme ने म्हटलं आहे. सुरूवातीला 15 मे रोजी Realme 2 Pro या स्मार्टफोनसाठीचे अपडेट्स रोलआउट केले जातील आणि त्यानंतर Realme U1 या स्मार्टफोनसाठी अपडेट्स जारी केले जातील. आणि त्यानंतर 15 जूनपासून Realme 2 आणि Realme C1 चे अपडेट्स मिळतील.

चक्क जग्वारने लॉन्च केली मेड इन इंडिया रेंज रोवर, किंमत एकदा पाहाच..

Android 9 Pie चं बीटा आणि ColorOS 6.0 चे नवे अपडेट युजर्सना Realme 2, Realme C1 आणि Realme C2 हे सोडून सगळ्या डिव्हाइसमध्ये Hyber Boost 2.0 मिळतील. Hyber Boost 2.0 मध्ये टच बूस्ट आणि फ्रेम बूस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यांच्या सहाय्याने स्मार्टफोनचा डिस्प्ले परफॉर्मंस आणखी उत्तम होईल असं कंपनीने म्हटलं आहे.

 

First published: May 12, 2019, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading