मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Real life Vampire: वयाची सत्तरी ओलांडलेली ही महिला आहे चिरतरुण; या उपायांनी 40 वर्षांनी घटवलं वय

Real life Vampire: वयाची सत्तरी ओलांडलेली ही महिला आहे चिरतरुण; या उपायांनी 40 वर्षांनी घटवलं वय

वॉशिंग्टन, 14 जुलै: लाखो प्रयत्न करुन लुक्सच्या (Looks) सहाय्याने तुम्ही तुमचे वय प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा 5 किंवा 10 वर्षे कमी असल्याचं भासवू शकता. परंतु, जर एखादी व्यक्ती प्रत्यक्ष वयापेक्षा 40 वर्षांनी लहान दिसत असत असेल तर त्याचं गुपित जाणून घेण्यासाठी तुम्ही बेचैन व्हाल. अमेरिकेतील एका फॅशन डिझानरला (Fashion Designer) पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावण्याचा साधा प्रयत्नही करणार नाही. छायाचित्रांमध्ये अतिशय सुंदर दिसणाऱ्या या महिलेने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.

न्यूयॉर्कमधील वेरा वांग (Vera Wang) या महिलेनं आपल्या जवळच्या मित्रांसोबत 27 जूनला आपला वाढदिवस साजरा केला. नियॉन ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केलेली वेरा वांग अत्यंत सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य पाहून तिनं वयाची सत्तरी पार केली आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

72 व्या वाढदिवसानिमित्त सुंदर ड्रेससह क्रिस्टल हेडबॅंड लावलेल्या या डिझाईनरचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) येताच लोकांनी पुन्हा एकदा तुम्ही हे सर्व कसं सांभाळता असं विचारणं सुरु केलं. आपल्या वयावर मात करत 72 व्या वर्षी 30 वर्षाच्या तरुणीसारख्या दिसणाऱ्या वांग यांना तुमच्या सौंदर्याचं (Beauty) जादुई रहस्य काय आहे, असा प्रश्न अनेक लोकांनी केला.

वाढदिवसाच्या पार्टीत वेरा वांग आपलं सौंदर्य शोऑफ करताना दिसली. ती स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड (Fashion Brand) चालवते आणि त्यासाठी मॉडेलिंग (Modelling) देखील करते. वाढदिवसाच्या (Birthday) पार्टीचे फोटो शेअर करत एका व्यक्तीने वांग हिचे कौतुक करताना म्हटले, की तुमचं वय पाहता त्या तुलनेत तुम्ही 50 वर्षाहून लहान दिसता. वेरा वांग हिचे व्यक्तिमत्व पाहिले की ती 72 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. तिचा फिटनेस, ड्रेसिंग सेन्स, मेकअप आणि हेअर स्टाईल अगदी तरुण मुलींपेक्षाही सरस आहे.

वेरा वांग सर्वप्रथम आपल्या जबरदस्त लुक्समुळे चर्चेत आली होती. जेव्हा तिने डेव्हिड ब्रायडल नावाच्या स्वतःच्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली होती, त्यानंतर लोक तिच्या कमनीय शरीराचे आणि शानदार अॅब्सचे (Abs) फॅन झाले होते.

तरुण नाहीच पण भयानक दिसू लागली; 2 लाखांची क्रीम लावूनही चेहऱ्याची भयंकर अवस्था

मला लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळतील, अशी अपेक्षा नव्हती. लॉकडाउन दरम्यान प्रथमच मी माझ्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केलं. मियामीमध्ये जवळपास मेकअप न करताच मी माझ्या ब्रॅण्डसाठी स्पोर्टस ब्रा आणि शॉर्टस परिधान करुन मॉडेलिंग केले, त्याचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करताच लोक माझा लूक पाहून मोहित झाले. या वयातही एखादी व्यक्ती इतकी परफेक्ट असू शकते, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता, असं वेरा वांगने सांगितले.

वेरा वांग एकटीच राहते. आपल्या एजलेस ब्युटीचं (ageless Beauty) रहस्य उलगडताना ती सांगते की तिचा फोकस खेळांशी संलग्न व्यायाम प्रकारावर असतो. तसेच दैनंदिन जीवनात चांगली झोप आणि कधीतरी कॉकटेल घेणं यांचा समावेश मी करते. व्यायामामुळे तणाव नाहीसा होतो, असं तिचं म्हणणं आहे.

एवढया परफेट्क्ट फिगरसाठी मी तासनतास व्यायाम आणि अजून काय-काय उपाय करत असेन असं लोकांना वाटतं. परंतु, सुरुवातीपासूनच मला खेळांमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे माझं शरीर टोन्ड आणि ट्रिम आहे. मी उत्तम स्केटर असून बॅले डान्सिंगचंही ट्रेनिंग घेतलं आहे. आयुष्यातील 16 वर्ष खूप कार्यक्षम राहिल्याने या वयातही माझे स्नायू बळकट असल्याचे वेरा वांग सांगते.

First published:

Tags: Beauty tips, Women