मुंबई, 06 जानेवारी: खातेवाटप झाल्यानंतर अनेक आमदारांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी तर दुसरीकडे राजधानी दिल्लीतील जेएनयू हल्ल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. याच पाश्वभूमीवर राज्यासह देशभऱातील आजच्या ठळक 05 घडामोडी.
1. राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री पुन्हा एकदा तुफान राडा झाला. त्याचे पडसाद पुण्यासह मुंबईतही पाहायला मिळाले. विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. मुंबईतही विविध विद्यार्थी संघटानांनी जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर आणि पवईमध्ये विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत.
सविस्तर बातमी वाचा-JNU मधील राड्याचे मुंबई-पुण्यात पडसाद, विद्यार्थी संघटनांकडून निदर्शनं
2.राज्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. मुंबईतही चांगलाच गारवा जाणवतोय. असं असताना पाऊस मात्र अजुनही पाठ सोडायला तयार नाही. काही दिवसांपूर्वीच विदर्भात गारपीट झाली होती. आता पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केलाय.
सविस्तर बातमी वाचा-सावधान...विदर्भ, मराठवाड्यात 'या' दोन दिवशी होणार पाऊस
3.राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंग बदलण्याची शक्यता आहे. मनसे पक्षाचा झेंडा बदलण्याच्या तयारीत आहे.
सविस्तर बातमी वाचा-शिवसेनेवर मात करण्यासाठी राज ठाकरेंची नवी खेळी, पक्षाचा झेंडा बदलणार!
4.भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिलाच टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पिच ओले असल्यामुळं पंचांनी हा निर्णय घेतला. त्यामुळं एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला. आता दुसरा सामना 7 जानेवारी रोजी इंदूरला होणार आहे.
सविस्तर बातमी वाचा-पावसामुळं नवीन वर्षातील पहिली टी-20 गेली पाण्यात, भारत-श्रीलंका सामना रद्द
5.भारत आणि स्वित्झर्लंडच्या आयकर अधिकाऱ्यांनी अशा लोकांची यादी जाहीर केली आहे ज्यांनी करचोरी करून स्विस बँकेत अवैधरित्या पैसे ठेवले आहेत. स्विस बँकेतील अशा खातेधारकांना नोटिस पाठवण्यात आली आहे. स्वित्झर्लंडचे आयकर अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तींची, खात्यांची माहिती भारताच्या आयकर विभागाला दिली आहे. यामध्ये 3 हजार 500 जणांना नोटिस पाठवण्यात आली असून 7 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सविस्तर बातमी वाचा-स्विस बँकेची 3500 भारतीयांना नोटिस, 7 जणांची नावे जाहीर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.