मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

RD बचतीचा चांगला मार्ग; मात्र ही काळजी घेतली नाही तर बसेल फटका, वाचा सविस्तर

RD बचतीचा चांगला मार्ग; मात्र ही काळजी घेतली नाही तर बसेल फटका, वाचा सविस्तर

आज सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंका, पोस्ट ऑफिस तसेच वित्तीय संस्था गुंतवणूक किंवा बचतीच्या अनेक योजना इच्छुकांसाठी राबवत आहेत. अशा योजना वैयक्तिक संकल्पांच्या पूर्तीसाठी निश्चितच हातभार लावू शकतात.

आज सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंका, पोस्ट ऑफिस तसेच वित्तीय संस्था गुंतवणूक किंवा बचतीच्या अनेक योजना इच्छुकांसाठी राबवत आहेत. अशा योजना वैयक्तिक संकल्पांच्या पूर्तीसाठी निश्चितच हातभार लावू शकतात.

आज सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंका, पोस्ट ऑफिस तसेच वित्तीय संस्था गुंतवणूक किंवा बचतीच्या अनेक योजना इच्छुकांसाठी राबवत आहेत. अशा योजना वैयक्तिक संकल्पांच्या पूर्तीसाठी निश्चितच हातभार लावू शकतात.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : योग्य आर्थिक नियोजनातून गुंतवणूक (Investment)  किंवा बचत (Saving) करणं नक्कीच फायदेशीर ठरतं. प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक असे काही संकल्प असतात. या संकल्पांच्या पूर्तीसाठी पैशांची गरज भासते. मिळणाऱ्या उत्पन्नातून ही गरज पूर्ण होतेच असं नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत हाती पैसे असावेत या दृष्टीकोनातून बहुतांश लोक सुरक्षित बचतीचा पर्याय स्वीकारतात. आज सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंका, पोस्ट ऑफिस तसेच वित्तीय संस्था गुंतवणूक किंवा बचतीच्या अनेक योजना इच्छुकांसाठी राबवत आहेत. अशा योजना वैयक्तिक संकल्पांच्या पूर्तीसाठी निश्चितच हातभार लावू शकतात.

रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे बचतीसाठी प्रमुख पर्याय आहेत. सर्व वित्तीय संस्थांमध्ये ही सुविधा मिळते. यातील योग्य पर्यायाची निवड करून तुम्ही बचत सुरू करू शकता.

रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी (RD) हा प्राथमिक स्वरूपात बचतीसाठी चांगला मार्ग आहे. यात तुम्ही अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीसाठी अगदी नाममात्र रकमेपासून बचतीस प्रारंभ करू शकता. यातून मिळणारं व्याज हे सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत जास्त असतं. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या माध्यमातून अधिक व्याज मिळते. बॅंक किंवा वित्तीय संस्थानिहाय हा व्याजदर थोड्याफार फरकानं वेगळा असू शकतो. तुम्ही बचतीसाठी जो कालावधी निवडता त्या कालावधीत तुम्हाला ठरलेल्या तारखेला निश्चित केलेली रक्कम आरडी अकाउंटमध्ये भरणं बंधनकारक असतं. तसेच ही रक्कम तुम्ही ऑनलाइन किंवा सेव्हिंग खात्यातूनही ट्रान्सफर करू शकता. तसेच बचत कालावधीतील काही महिन्यांची रक्कम तुम्ही आगाऊ (Advance) देखील जमा करू शकता. ज्या सार्वजनिक किंवा खासगी बॅंकांमध्ये मासिक ठेवींचं प्रमाण जास्त आहे, अशा बॅंकांची किमान शिल्लक रकमेची मर्यादा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे निश्चित वेळी आरडी अकाउंटमध्ये बचतीची रक्कम भरणं अनिवार्य आहे. काही कारणांमुळे तुम्ही जर सलग काही महिने निश्चित वेळी ही रक्कम अकाउंटमध्ये भरली नाहीत, तर संबंधित वित्तीय संस्था किंवा पोस्ट ऑफिस तुमच्याकडून दंड (Fine) वसूल करू शकते किंवा प्रसंगी तुमचं आरडी अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. याबाबतचे नियम नेमके काय आहेत ते जाणून घेऊया.

हे ही वाचा-RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

काही अपरिहार्य कारणांमुळे जर तुम्ही काही महिने निश्चित तारखेला आरडीची रक्कम अकाउंटमध्ये जमा करू शकला नाहीत तर संबंधित बॅंक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्याकडून दंड वसूल करू शकते. अर्थात यासाठीचे नियम बॅंकनिहाय आणि पोस्ट ऑफिसकरिता वेगवेगळे आहेत. परंतु, सर्वसामान्यपणे एखादा खातेदार सलग 4 महिने निश्चित तारखेला बचतीची रक्कम आरडी अकाउंटमध्ये जमा करू शकला नाही तर ही बाब ग्राह्य धरून कारवाई होत नाही. परंतु, 4 पेक्षा अधिक महिने रक्कम झाली नाही तर संबंधित खातेदारास डिफॉल्टर (Defaulter)  ठरवून प्रसंगी त्याचं अकाउंट बंद केलं जातं. अशा कारणामुळं खातं बंद झाल्यास पुढील (5 व्या) डिफॉल्टनंतर 2 महिन्याच्या कालावधीत शिल्लक रकमेचा हप्ता भरल्यानंतर पुन्हा अकाउंट सुरु करता येऊ शकतं. तसेच नियमानुसार संबंधित खातेधारकास प्रत्येक 100 रुपयांसाठी 1 रुपया डिफॉल्ट दंड आकारला जातो. आरडी अकाउंट पुन्हा सुरू करताना चुकलेल्या बचत रकमेव्यतिरिक्त हा दंड संबंधित खातेधारकाला भरावा लागतो. अशा वेळी जर खातेधारकाला पुन्हा आरडी अकाउंट पूर्ववत सुरू करायचं नसेल तर संबंधित बॅंक मुदतपूर्व पैसे काढण्याचा नियम लागू करते आणि त्यानुसार व्याज आकारून रक्कम जमा करते.

`एसबीआय`मध्ये (SBI) जर तुमचं आरडी अकाउंट असेल आणि तुम्ही काही महिने बचतीची रक्कम या अकाउंटमध्ये भरू शकला नाही तर बॅंक तुमच्याकडून दंड वसूल करते. यासाठी मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अकाउंटसाठी दरमहा प्रत्येक 100 रुपयांसाठी 1.50 पैसे दंड आकारला जातो. तसेच मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास दरमहा प्रत्येक 100 रुपयांसाठी 2 रुपये दंड आकारला जातो. जर एसबीआयच्या आरडी अकाउंट होल्डरनं (Account Holder) बचतीसाठी निश्चित केलेल्या रकमेचे सलग 6 हप्ते चुकवले तर बॅंक असं अकाउंट मुदतीपूर्वी बंद करून अकाउंटमधील रक्कम खातेदाराला देऊन टाकते.

`आरडी`च्या माध्यमातून बचतीची सुविधा पोस्टाच्या माध्यमातूनही दिली जाते. अत्यंत सुरक्षित पर्याय म्हणून अनेक जण या पर्यायाची बचतीसाठी निवड करतात. पोस्टाच्या माध्यमातून अगदी नाममात्र रकमेपासून आरडीत बचत करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आरडी अकाउंट सुरु केलं तर त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात तुम्हाला 15 तारखेपूर्वीच बचतीची रक्कम जमा करावी लागते. तसेच जर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेपासून ते महिनाअखेरीपर्यंतच्या कालावधीत आरडी अकाउंट सुरू केलं तर त्यापुढील महिन्यापासून महिनाखेर पर्यंत तुम्ही रक्कम जमा करू शकता. जर एखाद्या खातेधारकानं एका महिन्यासाठी हप्ता चुकवला तर तो डिफॉल्टची अट मानला जातो. अशावेळी प्रति 5 रुपयांसाठी 50 पैसे दंड खाते धारकाकडून वसूल केला जातो. त्यामुळे खातेधारकानं डिफॉल्ट दंडासह डिफॉल्ट रक्कम भरल्यानंतर तो चालु महिन्याची बचतीची रक्कम भरू शकतो. त्यामुळे आरडी अकाउंटमध्ये दरमहा बचत रक्कम जमा करणं हे एका अर्थानं खातेधारकासाठी बंधनकारक असतं.

First published:

Tags: Investment, Post office, SBI