IPL 2019 : RCBची विजयी हॅट्रिक, पंजाबवर 17 धावांनी विजय

IPL 2019 : RCBची विजयी हॅट्रिक, पंजाबवर 17 धावांनी विजय

आठपैकी सात सामने गमावल्यानंतर बंगळुरू संघानं पंजाब विरोधात विजयी हॅट्रिक साधली.

  • Share this:

बंगळुरू, 24 एप्रिल : आठपैकी सात सामने गमावल्यानंतर बंगळुरू संघानं पंजाब विरोधात आपल्या घरच्या मैदानावर विजयी हॅट्रिक साधली. केएल राहुलच्या संयमी खेळीनही पंजाबला विजय मिळवून दिला नाही. त्यामुळं बंगळुरूनं 17 धावांनी सामना जिंकला.

बंगळुरूनं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना, पुरननं 28 चेंडूत 46 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 42 धावा केल्या. मात्र त्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. गेलही या सामन्यात 23 धावा करत बाद झाला. बंगळुरूकडून उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी दोन विकेट घेतल्या. स्टेनच्या जागी खेळणाऱ्या टीम साऊदीला एकही विकेट घेता आली नाही.

दरम्यान, प्रथम नाणेफेक जिंकत पंजाबनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यातही विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर पार्थिव पटेलनं 43 धावांची चांगली खेळी केली. मागच्या सामन्यातही पार्थिवची बॅट तळपली होती. पार्थिवनं 24 चेंडूत 43 धावा केल्या.

त्यानंतर स्टोईनीस आणि एबी यांनी 64 चेंडूत शतकी भागीदारी करत बंगळुरूचा डाव सांभाळला. एबीनं आपलं 33वं अर्धशतक या सामन्यात पुर्ण केलं.

पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाल्यानंतर विराट कोहली 13 मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. पार्थिवने या दरम्यान फटकेबाजी करत काही चांगले फटके खेळले. मात्र मुरगन आश्विनच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. पार्थिवने 43 धावा केल्या.

VIDEO : जेव्हा नरेंद्र मोदी भेटतात पुणेकर रिक्षाचालकाला...

First published: April 24, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading