IPL 2019 : पहिल्याच सामन्यात धोनीचा चेपॉकवर 'विराट' विजय

IPL 2019 : पहिल्याच सामन्यात धोनीचा चेपॉकवर 'विराट' विजय

चेन्नईच्या फिरकी गोलंदाजीसमोर नांगी टाकत बंगळुरूच्या संघाने केवळ 70 धावा केल्या, आणि हे आव्हान चेन्नईने केवळ 17 ओव्हरमध्ये पार केले.

  • Share this:

चेन्नई, 23 मार्च : :आयपीएलचा पहिला सामना अटीतटीचा होणार अशी अपेक्षा असताना, धोनीच्या चेन्नई संघाने मात्र, बंगळुरू संघावर अगदी आरामात मात केली. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी सार्थ ठरविला. चेन्नईच्या संघासमोर नांगी टाकत संपुर्ण संघ केवळ 70 धावात बाद झाला. तर, 70 धावांचा पाठलाग करत असताना, अंबाती रायडूने मोलाचे 28 धावांचे योगदान दिले. तर, रैनाने आपल्या 19 धावांच्या खेळीने पाच हजार धावांचा पट्टा तर गाठलाच तसेच, संघाला विजयाच्या जवळही आणले. तर केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी चेन्नई संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या पराभवामुळे विराट कोहली चांगलाच निराश झाला असणार आहे.

याआधी गोलंजादीमध्ये हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांनी अजूक मारा करत बंगळुरूच्या फलंदाजांना हैराण केले. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. पार्थिव पटेल याने २९ धावांची अत्यंत संयमी खेळी केली. त्याने १७.१ षटकांच्या खेळात केवळ ३५ चेंडू खेळले. त्याने २९ धावांच्या खेळीत केवळ २ चौकार लगावले. हरभजन सिंहने आपल्या चार ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देत तीन विकेट घेतं बंगळुरू संघाचं कंबरडं मोडलं तर, ताहिरने फक्त ९ धावांमध्ये बंगळुरुच्या तीन फलंदाजांना बाद केले. धोनीने पॉवर प्लेमध्ये आधी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंहला दुसऱ्या ओव्हरमध्येच गोलंदाजी करण्यास सांगितले.याचबरोबर तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.

वाचा- IPL 2019 : पाच कोटींच्या 'या' खेळाडूला फोडता आला नाही भोपळा

धोनीसाठी होम ग्राऊंड लकीच

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात आला.या दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये आठ सामने खेळले गेले. या आठ सामन्यांपैकी तब्बल सातवेळा चेन्नईने बंगळुरूवर विजय मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading