लवकरच येणार 200 आणि 500 च्या नव्या नोटा; RBI ची माहिती

चलनातील आणि नव्याने जारी करण्यात येणाऱ्या 200 आणि 500 रुपयांच्या सर्वच नोटा वैध राहणार असल्याची RBI ची माहिती.

  • Share this:

रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नव्या सिरीजमध्ये महात्मा गांधींचं चित्र असलेल्या 200 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. त्यावर RBI चे गवर्नर शक्तिकांत दास यांची सही राहणार असल्याचं RBI ने ट्विट पोस्टद्वारे जाहीर केलं आहे.

चलनात असलेल्या आणि नव्याने जारी करण्यात येणाऱ्या 200 आणि 500 रुपयांच्या नोटा सर्वच वैध राहतील, असं रिजर्व बँकेने स्पष्ट केलं आहे. नव्या नोटा दिसायला आधीपासूनच चलनात असलेल्या नोटांसारख्या असतील असंही RBI ने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

डिसेंबर 2018 मध्ये रिजर्व बँकेचे माजी गवर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर शक्तिकांत दास यांची या पदाची सुत्र हाती घेतली. त्यानंतर RBI ने शक्तिकांत दास यांची सही असलेल्या शंभराच्या नव्या नोटा जारी केल्या. आधीपासून चलनात असलेल्या आणि नव्याने जारी करण्यात आलेल्या शंभराच्या सर्व नोटा या वैध असल्याचं RBI ने म्हटलं आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय झाला. त्यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर RBI ने 2000, 500, 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbi
First Published: Apr 24, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या