Home /News /news /

2000 हजारांच्या नोटेची छपाई आरबीआयकडून बंद होणार ?

2000 हजारांच्या नोटेची छपाई आरबीआयकडून बंद होणार ?

नोटबंदीनंतर मोदी सरकारने घाईघाईत बाराजात आणलेली 2 हजारांच्या नोटेची छपाई आरबीआय लवकरच बंद करण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या क्रांती घोष यांनीच यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत.

21 डिसेंबर, नवी दिल्ली : नोटबंदीनंतर मोदी सरकारने घाईघाईत बाराजात आणलेली 2 हजारांच्या नोटेची छपाई आरबीआय लवकरच बंद करण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या क्रांती घोष यांनीच यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत. 2000 हजाराची नोट चलनात वापरताना तिची मोड मिळण्यात ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय म्हणूनच आरबीआयन छापलेल्या 2000 हजारांच्या अतिरिक्त नोटा तुर्तास चलनात आणणार नसल्याचं सौम्या कांती घोष यांनी स्पष्ट केलंय. नोटबंदीच्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा चलनकल्लोळ माजला होता. म्हणून मोदी सरकारने घाईघाईत 2000ची नोट चलनात आणली खरी पण या नोटेची रक्कम मोठी असल्याने तिची मोड घेताना सामान्य ग्राहकांना प्रचंड त्रास झाला. दुकानदारही 2000 हजारांचे सुट्टे करून देता देता मेटाकुटीस आले होते, म्हणून मग सरतेशेवटी सरकारने 500 रुपयांची नवीन नोट चलनात आणली तेव्हा कुठे बाजारातली परिस्थिती आटोक्यात आली. पण तरिही 2 हजारांची नोट चलनात वापरताना सामान्य ग्राहकांना सुट्ट्या पैशांचा प्रश्न आजही भेडसावतोय. तशा स्वरूपाच्या अनेक तक्रारीही आरबीआयकडे गेल्यात. त्यामुळेच आरबीआयकडून 2000 हजारांची नोट छपाई देखील कमी करण्यात आलीय. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या 2,46,300 कोटी रुपये किंमतीच्या नोटा चलनात आहेत. 8 डिसेंबर 2017 पर्यंत आरबीआयने 15,78,700 कोटी रुपये किंमतीच्या मोठ्या नोटा चलनात आणल्यात. एसबीआयच्या एका अहवालानुसार मार्च 2017 पर्यंत 3,501 अरब रुपये हे छोट्या नोटांच्या रूपात चलनात उपलब्ध आहेत. तर मोठ्या नोटांच्या स्वरुपात 8 डिसेंबर पर्यंत 13,324 अरब रुपये बाजारात आहेत. अर्थमंत्रालयाने लोकसभेत सांगितलेल्या आकडेवारीनुसार 500 रुपयांच्या नोटेच्या रुपात 16957 करोड़ तर 2,000 रुपयांच्या नोटेच्या स्वरूपात 3654 करोड रुपये चलनात आहेत. या दोन्ही मोठ्या नोटांच्या रुपाने बाजारात एकूण किंमत ही 15787 अरब रुपये होते. अशातच आरबीआयने 2,463 अरब रुपयांच्या जास्तीच्या नोटांची छपाई करून ठेवलीय. म्हणूनच आता यापुढे कदाचित 2000 हजारांच्या नोटांची छपाई बंद केली जाऊ शकते.
First published:

Tags: Rbi 2000 notes, आरबीआय़चे संकेत, छपाई बंद होणार

पुढील बातम्या