S M L

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ : ग्राहकांना फटका, गृहकर्ज महागणार

आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांची कर्जे महागणार असून, याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

Updated On: Aug 1, 2018 03:57 PM IST

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ : ग्राहकांना फटका, गृहकर्ज महागणार

मुंबई,ता.1,ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून तो 6.50 टक्क्यांवर नेण्यात आलाय. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ होऊन तो 6.25 टक्क्यांपर्यंत गेला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेती स्थिती पाहता व्याजदर वाढवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरूवारी हे पतधोरण जाहीर केलंय. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांची कर्जे महागणार असून, याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. रिझर्व्ह बँकेने याआधी 6 जूनला पतधोरण जाहीर केलं होतं.

काय आहे निर्णय? - रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढून 6.50 करण्यात आलाय. तर रिव्हर्स रेपो रेट 6 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यावर गेलाय.

का झाली वाढ? - सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता हे दर वाढवण्यात आल्याचं कारण आरबीआयने दिले आहे. या निर्णयामुळे जवळपास सर्वच कर्ज महागण्याची चिन्हे आहेत.

ईएमआय वाढणार का? - या निर्णयामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या पैशांवर जास्त व्याज लागणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांना देत असलेल्या कर्जावरचा व्याज दर वाढवतात. या आधी एसबीआयने जुलैमध्ये व्याजदरात 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के दर वाढवले होते. त्यामुळे गृहकर्जांसहीत सर्वच कर्ज महागणार आहेत.

आरबीआयने काय म्हटलंय?

Loading...
Loading...

आरबीआय ने 2019 मध्ये जीडीपी विकास दर 7.4 टक्के कायम राहील.

एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात जीडीपी विकासदर 7.5 ते 7.6 टक्के एवढा असले.

जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये महागाई दर 4.2 टक्के असेल.

ऑक्टोंबर ते मार्च या महिन्यांमध्ये महागाई दर 4.8 टक्के एवढा असेल.

मॉनिटरी पॉलीसी कमेटीची पुढची बैठक 3 ते 5 ऑक्टोंबरला होणार आहे.

रेपो रेट- रोजच्या कामकासाजासाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. या बँकां हे पैसे रिझर्व्ह बँकेकडून व्याजाने घेतता. रिझर्व्ह बँक ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट होय.

रिर्व्हस रेपो रेट - नावाप्रमाणेच हा दर असतो. रिझर्व्ह बँक जसं बँकांना पेसै व्याजानं देतात. त्याच प्रमाणं बँकांकडे शिल्लक राहिलेला पैसा बँका रिझर्व्ह बँकेत ठेवत असतात. या पैशावर रिझर्व्ह बँक या बँकांना जे व्याज देते त्याला रिर्व्हस रेपो रेट असं म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 03:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close